ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

तब्बल एक वर्षानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये 'गोडवा' पाहायला मिळाला.

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये 'गोडवा', पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

बीड : तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला. ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. (Pankaja Munde And Dhananjay Munde Attend meeting in Pune)

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. गेल्या दोन महिन्यापासून ऊसतोड मजुरांच्या वाढीव दरवाढीचा प्रश्न गाजत होता.

एरवी राजकारणातून एकमेकांवर चिकल फेकणारे भावंड आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात  झालेल्या बैठकीत एकत्रित आले. त्यामुळे बीड जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं उधाण आलं.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे यांना पंकजा यांच्याशी संवाद साधला का, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी, ‘एखाद्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर संवाद झाला तर काय वाईट आहे’, असे उत्तर दिले.

पंकजा मुंडे यांनीही जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्यात काही वावगे नसल्याचे सांगितले. परंतु, याचा अर्थ मागचं सगळं मिटल असाही नाही, असेही सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

दोन दिवसांपूर्वी धनंजय-पंकजांमध्ये वाकयुद्ध

धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना टोला लगावला होता. काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठीच जिल्ह्यात येतात. एरवी जिल्ह्यातील लोकांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. पंकजा मुंडे यांनी आज (27 ऑक्टोबर) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं. एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून 8 जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यानंतर मोठा मेळावा घेत असेल, तर ही पुण्याईच म्हणावी लागेल. अशाप्रकारे पराभव साजरा करायचं नशीब कुणाला लाभतं, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

(Pankaja Munde And Dhananjay Munde Attend meeting in Pune)

संबंधित बातम्या

पराभव साजरा करायलाही नशीब लागतं; पंकजाताईंकडून धनंजय मुडेंना चोख प्रत्युत्तर

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

Published On - 7:56 pm, Tue, 27 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI