गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. (Gopinathrao Munde Kamgar Kalyan Mahamandal will get strength Says Dhananjay Munde)

राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून आज 27 ऑक्टोबर रोजी विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाला बळकटी देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजना याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच महामंडळाला स्वायत्त व सक्षम बनवण्यासाठी करण्यात येणारी नियमावली याबाबतची सविस्तर माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

महामंडळाचे प्रादेशिक स्तरावर कार्यालय, कंपनी कायद्या अंतर्गत नियमावली बनवणे, ऊसतोड कामगार, पशु, वाहने आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थ सहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना, यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शरद पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा आशावाद पवारांनी व्यक्त केला. महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटी बाबत सामाजिक न्याय विभागाच्या कार्याबद्दल पवारांनी समाधान व्यक्त केले. तसेच महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबर अखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबर पासून महामंडळाचे कामकाज पुर्ण क्षमतेने सुरु करण्याचे निर्देश शरद पवार यांनी यावेळी दिले.

(Gopinathrao Munde Kamgar Kalyan Mahamandal will get strength Says Dhananjay Munde)

संबंधित बातम्या

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले; धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला

भाजपचा गड ढासळला, शरद पवार खडसेंना न्याय देतील : धनंजय मुंडे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *