मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार कालिदास कोळंबकर, तामिळ सेलवन, सुनिल राणे, खासदार सय्यद जाफर आदी नेते उपस्थित होते.
भाजपची ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
तसेच, काँग्रेस काश्मीरमधील गुपकर आघाडीसोबत का? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसलाही घेरलं.
देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
यावेळी या बैठकीत 2022 साली होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली.
बैठकीसाठी मुंबई भाजपचे कार्यकर्ते, पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.