मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो उलटली, 33 जण जखमी

भिवंडी येथून स्थलांतरित मजुरांना घेऊन अलाहाबादला निघालेल्या बोलेरो गाडीचा (Bolero accident in Wardha) वर्ध्यात भीषण अपघात झाला.

मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो उलटली, 33 जण जखमी
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 3:24 PM

वर्धा : भिवंडी येथून स्थलांतरित मजुरांना घेऊन अलाहाबादला निघालेल्या बोलेरो गाडीचा (Bolero accident in Wardha) वर्ध्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 33 मजूर जखमी झाले असून यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे (Bolero accident in Wardha).

केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारसाठी नियमावलीदेखील जारी केली आहे. याशिवाय सरकार हळूहळू रेल्वे किंवा बसमार्फत मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्याचं नियोजन करत आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही मजूर भिवंडी येथून बोलेरोने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. ही गाडी भरधाव वेगात होती. नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सूटला. त्यामुळे बोलेरो गाडी जागेवरच पल्टी झाली. या दुर्घटनेत तब्बल 33 मजूर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे स्थलांतरित मजुरांच्या हातातील कामं गेली. कोरोनाचे दररोज नवे रुग्ण आढळत असल्यामुळे मजुरांच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गावाची ओढ लागली आहे. आपल्या गावी गेल्यावर आपण सुरक्षित राहू, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते मिळेल्या त्या गाडीने किंवा पायी आपल्या राज्याच्या दिशेला निघाले आहेत.

संबंधित बातमी :

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात गोळीबार प्रकरण, 5 पोलिस निलंबित, नांगरे-पाटलांची कारवाई

Railway IRCTC | मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.