AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलजवळ एसटीत बॉम्ब, रायगड जिल्हा हाय अलर्टवर

पनवेल (रायगड) : पनवेल शहरापासून काही अंतरावर असलेल्या आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसटीत सापडलेला बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे संभाव्य वित्त आणि जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रायगड […]

पनवेलजवळ एसटीत बॉम्ब, रायगड जिल्हा हाय अलर्टवर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

पनवेल (रायगड) : पनवेल शहरापासून काही अंतरावर असलेल्या आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एसटीत सापडलेला बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे संभाव्य वित्त आणि जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी बस तपासण्याचेही आदेश पोलिसांनी दिले आहेत.

पेण ते आपटा येथे वस्तीसाठी गेलेल्या एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याचे उघडकीस आले. पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेल्या ऑपरेशननतंर बॉम्ब निकामी करणात बॉम्ब विनाशक पथकाला यश आलं.

बस वाहकाने प्रवाशाने विसरलेल्या पिशवीची पहाणी केली असता वाहकाला त्यामध्ये इलेक्ट्रिक वायर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू गुडांळून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या. त्याने तात्काळ चालकासह इतर ग्रामस्थांना बोलावून त्यांना दाखवले. त्यानंतर तात्काळ रसायनी पोलिसांना बोलवण्यात आले. तोपर्यंत आपटा गावासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

पोलिसांनी घटनेचा आढावा घेत जिल्हा अधिक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुजांळ, उपविभागीय पोलीस अधीकारी रणजीत पाटील, जालिदंर नालाकुल यांना परिस्थीती ची माहीती दिल्याने सर्व वरिष्ट अधिकारी बॉम्ब विनाशक पथक, डाँग स्काँड सह घटना स्थळी दाखल झाले.

आगोदरच पोलिसांनी खबरदारी ग्रामस्थांना या एसटी बसच्या जवळपास येण्यास मज्जाव केला होता. अत्यंत शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने सदरची बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात पहाटे चार वाजेपर्यंत यंत्रणाना यश आले. या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील वीज प्रवाह बंद करण्यात आला होता. ग्रामस्थही भितीच्या सावटाखाली वावरत होते. परंतु चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात यत्रंणाना यश आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

या वेळी रायगड पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आर. सी. पी दलाचे अधिकारी उपस्थीत होते. या सदंर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय स्फोटक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदाळे हे पुढील तपास करीत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.