रात्रीच्या सुमारास घरी, प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू

रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसल्याने तिच्या कुटुंबियांकडून प्रियकराला बेदम मारहणा करण्यात आली (Girlfriend family beaten boyfriend) आहे.

रात्रीच्या सुमारास घरी, प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Feb 06, 2020 | 9:20 AM

बुलडाणा : रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसल्याने तिच्या कुटुंबियांकडून प्रियकराला बेदम मारहणा करण्यात आली (Girlfriend family beaten boyfriend) आहे. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल (5 फेब्रुवारी) बुलडाणा जिल्ह्यातील संग्रापूर तालुक्यातील सावळा गावात घडली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (Girlfriend family beaten boyfriend) दिली आहे.

बुलडाणा येथील संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथे मृत तरुण ज्ञानेश्वर घिवे (35) राहत होता. त्याच्या शेजारील घरात असलेल्या मुली सोबत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काल मृतक ज्ञानेश्वर त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतक ज्ञानेश्वर घिवे याचे आरोपी प्रभाकर धूळ यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. रात्री मृतक ज्ञानेश्वर हा प्रेयसीच्या घरात घुसल्याचे आरोपीने पाहिले आणि त्याला घरातून बाहेर काढत कुऱ्हाडीचे दांड्याने आणि काठीने बेदम मारहाण केली.

मृतक ज्ञानेश्वर यांच्या विडलांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपी प्रभाकर धुळ, गजानन धुळ, अजाबराव धुळ, गणेश धुळ, प्रकाश धुळ, रामराव धुळ, विठ्ठल धुळ आणि ज्ञानेश्वर धुळ या आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सहा आरोपी अद्याप फरार आहेत. गणेश धुळ आणि ज्ञानेश्वर धुळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.