प्रेमविवाह केल्याने जिवंत बहिणीला बॅनर लावत “श्रद्धांजली”, पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

| Updated on: Nov 02, 2019 | 7:55 PM

समाजात घडणाऱ्या घटनांवर जसे चित्रपट बनतात, तसेच कधीकधी चित्रपटातील घटनांप्रमाणे वास्तवात वर्तन होताना दिसते. रायगडमधील म्हसळा येथे “सनम तेरी कसम” या सिनेमासारखा प्रकार घडला आहे.

प्रेमविवाह केल्याने जिवंत बहिणीला बॅनर लावत “श्रद्धांजली”, पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us on

रायगड : समाजात घडणाऱ्या घटनांवर जसे चित्रपट बनतात, तसेच कधीकधी चित्रपटातील घटनांप्रमाणे वास्तवात वर्तन होताना दिसते. रायगडमधील म्हसळा येथे “सनम तेरी कसम” या सिनेमासारखा प्रकार घडला आहे. एका तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे ती आमच्यासाठी मेली असे म्हणत तिच्या भावाने तिला श्रद्धांजली देणारे बॅनर (Homage Banner of Sister after love marriage) संपूर्ण म्हसळा शहरात लावले. तरुणीला भावाने लावलेले बॅनर पाहून धक्का बसला आणि तिने थेट विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पीडित तरुणीने म्हसळा शहरात 30 ऑक्टोबरला प्रेम विवाह करून याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. मात्र, हा विवाह मुलीच्या भावाला आणि त्याच्या मित्रांना मान्य नव्हता. त्यानंतर मुलीच्या भावाने शहरातील एका स्थानिकाला सोबत घेऊन चक्क “ती” आमच्यासाठी मेली असं जाहीर करत कुटुंबातर्फे “भावपूर्ण श्रद्धांजली”चे बॅनर (Homage Banner of Sister after love marriage) संपूर्ण शहरात लावले. 1 नोव्हेंबरला लावलेले हे बॅनर नंतर काढण्यात आले. मात्र, तरुणीच्या भावाने पुन्हा 2 नोव्हेंबरच्या पहाटे असेच बॅनर लावले. त्यामुळे अखेर वैतागून पीडीत मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण आहे.

पीडित मुलीच्या भावासह त्याच्या मित्रांनी केलेल्या या बॅनरबाजीमुळे 2 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या या तरुणीने थेट विष प्राशान करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी बॅनर छपाई करणाऱ्या आणि बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत शेकडो नागरिकांनी म्हसळा पोलीस ठाणे गाठले. या सर्व प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.