SSR Case | सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सात तास, तर राधिका-श्रुती यांची समोरासमोर बसवून चौकशी

सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आता संशयितांच्या चौकशीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

SSR Case | सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सात तास, तर राधिका-श्रुती यांची समोरासमोर बसवून चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची (CBI Inquiry Of Indrajit Chakraborty) गेल्या सात तासा पासून चौकशी सुरु आहे. तर सॅम्युल मिरांडा आणि श्रुती मोदी या दोघांचीही गेल्या सात तासापासून चौकशी सुरु आहे (CBI Inquiry Of Indrajit Chakraborty).

सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आता संशयितांच्या चौकशीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. आज तीन आरोपींची सतत चौकशी सुरु आहे. रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांची गेल्या सात तासापासून चौकशी सुरु आहे. तर यावेळी सुशांतच्यासोबत राहणारा सिद्धार्थ पिठाणी, नोकर नीरज सिंह, केशव बचनेर हे देखील सीबीआय कार्यालयात उपस्थित आहेत. या साक्षीदार आणि आरोपींना समोरा-समोर बसवून चौकशी सुरु आहे. श्रुती मोदींचा आजचा चौकशीचा तिसरा दिवस आहे. तर सॅम्युअलला गेली सहा दिवस सतत चौकशीसाठी बोलावलं जात आहे.

आज चौकशीसाठी सुशांत याची पीआर मॅनेजर राधिका निहलानीला देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. राधिका हिची स्वतःची थिंकिंग कम्युनिकेशन नावाची पीआर कंपनी आहे. ही कंपनी सुशांतचं सर्व काम पाहत होती. सुशांतला किती पैसे मिळत होते आणि त्याच्या पीआरवर तो किती पैसे खर्च करत होता. याची माहिती सीबीआयचे अधिकारी घेत आहेत (CBI Inquiry Of Indrajit Chakraborty).

तर राधिका आणि श्रुती यांना समोरासमोर बसवून सीबीआयचे अधिकारी चौकशी करत आहेत. रियाच्या वडिलांकडे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीबाबत सतत चौकशी केली जात आहे. कालही (1 सप्टेंबर) इंद्रजित यांच्याकडे संपत्तीबाबत चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब झाल्याच्या आरोप करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरु आहे.

सुशांतचा पैसा रियाने आपल्या वडिलांच्या माध्यमातून वळवला असल्याचा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे इंद्रजित चक्रवर्ती यांच्याकडे सतत चौकशी केली जात आहे. उद्या सुशांतशी संबंधित आणखी काही साक्षीदारांना बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

CBI Inquiry Of Indrajit Chakraborty

संबंधित बातम्या :

SSR Case | आर्थिक व्यवहार, वॉटर स्टोन रिसॉर्ट आणि, ड्रग्स! सीबीआय चौकशीत काय काय झालं?

रणवीर, रणबीर, विकी आणि अयानने ड्रग्ज टेस्टमध्ये निर्दोषत्व सिद्ध करावे, कंगनाचे चॅलेंज

Published On - 7:32 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI