Marathi News » Latest news » Cds bipin rawat helicopter crash brigadier lakhbinder singh lidder commanding of a division daughter on his last ritual
Brigadier lakhbinder singh lidder| गहिवरलेले मन, डोळ्यांमध्ये अश्रू, शूर पित्याला दिली आदरांजली, ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप
हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेले ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांचे पार्थिव बेस हॉस्पिटलमधून आणले गेले . त्यांच्या पार्थिवावर सकाळी ब्रार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सी डी एस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पण त्यांच्या सोबतच भारतीय लष्करातील काही शूर अधिकाऱ्यांना वीरमरण आले. ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिड्डर हे त्यांपैकी एक.
सी डी एस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पण त्यांच्या सोबतच भारतीय लष्करातील काही शूर अधिकाऱ्यांना वीरमरण आले. ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिड्डर हे त्यांपैकी एक. आज त्यांच्या पर्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांना भारत सरकार कडून मानवंदना देण्यात आली. ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांच्या पार्थिवावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पत्नी गीतिका या भावूक झाल्या. पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांनी ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर यांचा फोटो आणि राष्ट्रध्वज स्वीकारला. या प्रसंगी त्यांची 16 वर्षीय मुलगी आसना हिनं आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेतले.
हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेले ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांचे पार्थिव बेस हॉस्पिटलमधून आणले गेले . त्यांच्या पार्थिवावर सकाळी ब्रार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरियाणातील ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिडर हे त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील लष्करी अधिकारी होते, ब्रिगेडियर लिडर हे जनरल बिपीन रावत यांच्या स्टाफमध्ये वर्षभराहून अधिक काळ कार्यरत होते. त्यांनी जम्मू-काश्मीर रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनचे नेतृत्व केले.