राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

| Updated on: Sep 02, 2020 | 12:33 AM

मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे (Permission to interstate train travel in Maharashtra).

राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
भारतीय रेल्वे वर्षाकाठी 70,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीची उत्पादने खरेदी करते. मेक इन इंडिया धोरणांतर्गत, केवळ 50 टक्के पेक्षा जास्त स्थानिक उत्पादने असलेले पुरवठा करणारे रेल्वे वॅगन, ट्रॅक आणि एलएचबी डब्यांच्या टेंडरमध्ये 50 टक्के अधिक स्थानिक उत्पादनं भागीदारी करू शकतात.
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी (31 ऑगस्ट) ‘अनलॉक 4’ च्या लाईडलाईन्स जारी केल्या. या गाईडलाईन्समध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी असणारी ई-पासची अट रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. राज्य सरकारच्या गाईडलाईन्सच्या आधारावर मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे (Permission to interstate train travel in Maharashtra).

सध्या राज्यात 200 रेल्वे गाड्या सुरु आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Permission to interstate train travel in Maharashtra).

केंद्र सरकारने ‘अनलॉक 2’ नंतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु केल्या. तेव्हापासून मुंबईहून जवळपास 200 रेल्वे गाड्या सूटत आहेत. मात्र, या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर थांबा नव्हता. मात्र, आता या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरही थांबा असणार आहे.

राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणं जरुरीचं आहे. प्रवाशांना 2 सप्टेंबरपासून रेल्वे बुकिंग करता येणार आहे, असं रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई लोकलबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र, राज्य सरकारची परवनागी हवी, असं काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद?

  • कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
  • राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
  • शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  • 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे
  • चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  • मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही

शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लास 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्याशिवाय सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जातील.

तर 2 सप्टेंबरपासून अनावश्यक दुकानं सुरु राहतील. तसेच दारुची दुकानेही सुरु राहणार आहे. हॉटेल आणि लॉज हे 100 टक्के क्षमतेद्वारे सुरु करता येणार आहे.

त्याशिवाय मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. त्याशिवाय जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही.

संबंधित बातम्या :

Unlock 4 | ई-पास रद्द, हॉटेल सुरु, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद, राज्य सरकारची नियमावली

Unlock 4 | केंद्राकडून गाईडलाईन्स जारी, मेट्रोला हिरवा कंदील, शाळा-कॉलेज मात्र बंद