‘चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता’

| Updated on: Nov 03, 2020 | 7:15 PM

चंद्रकांत पाटील आता कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करत आहेत. | Satej Patil

चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता
सतेज पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us on

कोल्हापूर: चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय 2019 सालीच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील आता कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करत आहेत. मात्र, आता यावरील चर्चेला अर्थ उरलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. मग तुम्ही कोणाला राजीनामा द्यायला लावणार, असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला. (Satej Patil take a dig at Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो, याचा विरोधकांकडून कायम उल्लेख केला जातो. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. हवं तर कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत हरल्यास मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानाला सतेज पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. आता या चर्चेला अर्थ नाही. कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तुम्ही 2019 मध्येच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर चंद्रकांत पाटील काय बोलणार, हे पाहावे लागेल.

‘साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव’
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लोकांना भरपूर मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

संबंंधित बातम्या:

मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन -चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

(Satej Patil take a dig at Chandrakant Patil)