चंद्रपुरात दारुबंदीनंतर हुक्का पार्लरवर धडक कारवाई, डझनभर हुक्का पॉट जप्त

| Updated on: Mar 08, 2020 | 10:51 AM

चंद्रपूर शहरात दारुबंदीनंतर पहिल्यांदा पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर धडक कारवाई (Chandrapur police action on Hukaa Parlor) केली.

चंद्रपुरात दारुबंदीनंतर हुक्का पार्लरवर धडक कारवाई, डझनभर हुक्का पॉट जप्त
फोटो प्रातनिधिक
Follow us on

चंद्रपूर : शहरात दारुबंदीनंतर पहिल्यांदा पोलिसांनी एका हुक्का पार्लरवर धडक कारवाई (Chandrapur police action on Hukaa Parlor) केली. यात मालकासह बड्या घरातील 14 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच डझनभर हुक्का पॉट, प्रतिबंधित तंबाखू, फ्लेवर्स या गोष्टीही जप्त केल्या. गोल्डन रेस्टॉरंट असे या हॉटेलचे नाव आहे. दाताळा मार्गावर उच्चभ्रू वस्तीत हे हॉटेल आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी (Chandrapur police action on Hukaa Parlor) लागू होऊन आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत दारू तस्करी मोठ्या संख्येत होत असताना युवावर्ग ड्रग्जच्या अधीन होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरातील दाताळा मार्गावर उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गोल्डन रेस्टॉरंट या हॉटेलवर धाड टाकली. यात पोलिसांनी हुक्का पार्लर उध्वस्त केला आहे. याठिकाणी काही बड्या घरची मुलं हुक्का पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रामनगर पोलिसांच्या पथकाने यावर कारवाई केली.

पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

या कारवाईदरम्यान जवळपास 14 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात काही मुलं ही अल्पवयीन आहेत. धाडी दरम्यान हुक्का पॉट्स, विविध फ्लेवर्सचे तंबाखू व इतर सामग्री देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. गोल्डन रेस्टॉरंट हे ठिकाण याआधी बार-रेस्टॉरंट होते. दारूबंदीनंतर याचे हॉटेलमध्ये रुपांतर झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी वेगळ्या वळणावर जात असून यात युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याची कुजबुज होत होती. पोलिसांनी विविध कलमानुसार या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. याचा अधिक तपास रामनगर पोलीस करत (Chandrapur police action on Hukaa Parlor) आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे-सोलापुरातून चोरलेल्या 44 बाईक्स जप्त, उस्मानाबादमध्ये टोळीचा पर्दाफाश