AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाण्यात आमदार राहुल बोंद्रे आणि श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा राडा

बुलडाणा: बुलडाण्यातील चिखली इथं एका कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाला. या राडेबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने 6 पोलीस जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तसंच भाजप नेत्या श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे प्रकरण? चिखली […]

बुलडाण्यात आमदार राहुल बोंद्रे आणि श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा राडा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

बुलडाणा: बुलडाण्यातील चिखली इथं एका कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाला. या राडेबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने 6 पोलीस जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तसंच भाजप नेत्या श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

चिखली तालुक्यातील धोत्राभनगोजी इथे एका शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे इथे कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि भाजप नेत्या, तसेच जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली. श्रेयवादातून दोघांनी एकमेकांना टोमणे लगावले.

या वादावादीमुळे भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले.  त्यातूनच एका भाजपा कार्यकर्त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण झाली. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली.  त्यावेळी पोलीस स्टेशन परिसरात हजारांहून अधिक जमाव जमला. मात्र आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर चिखलीतील राजकारण चांगलेच तापल्याचं या प्रकारावरुन दिसून येतं. काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे आणि महिला बालकल्याण समिती सभापती श्वेता महाले यांच्यामध्ये खटके उडण्याची मालिका सुरु झाली आहे. धोत्राभनगोजी इथे घडलेल्या घटनेचे पडसाद, शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर या दोन्ही नेत्यांची बाचाबाची पोलीस स्टेशनमध्येही सुरु होती.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.