आता पर्याय नाही, आयुष्यात पहिल्यांदा उपोषणाला बसतोय : खासदार छत्रपती संभाजीराजे

सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार (Sambhaji Raje will sitting on fast) आहे.

आता पर्याय नाही, आयुष्यात पहिल्यांदा उपोषणाला बसतोय : खासदार छत्रपती संभाजीराजे
Follow us
| Updated on: Jan 09, 2020 | 5:52 PM

पुणे : सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार (Sambhaji Raje will sitting on fast) आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे निवेदन दिलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सारथी संस्थेसाठी येत्या 11 जानेवारीला पुण्यात लाक्षणिक उपोषण करणार (Sambhaji Raje will sitting on fast) आहेत.

“सारथी संस्था मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता.”

त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेतली. यानंतर सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. पण जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? असा प्रश्नही संभाजीराजेंनी निवदेनातून विचारला (Sambhaji Raje will sitting on fast) आहे.

आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. दिनांक- 11-01-2020 रोजी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथी च्या लाभार्थ्यांसोबत बसणार  (Sambhaji Raje will sitting on fast)आहे. असे संभाजी राजेंनी निवदेनात म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.