मराठा आंदोलकांमुळे पंढरपुरात न गेलेले मुख्यमंत्री आज म्हणतात…..

मराठा आंदोलकांमुळे पंढरपुरात न गेलेले मुख्यमंत्री आज म्हणतात.....

पंढरपूर: आषाढी एकादशीची महापूजा करता न आलेल्या मुख्यमंत्र्यानी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. राज्यात मोठा दुष्काळ असल्याने बळीराजाला आशिर्वाद देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यानी विठूरायास घातले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.

आषाढी एकादशीला मराठा आरक्षण आंदोलनामुळे  विठूरायाची महापूजा करता आली नव्हती. विठूरायाचे दर्शन घेण्याची इच्छा होती ती संधी आज आपणास मिळाली आहे. आज आपण विठूरायाचे दर्शन घेतलं आहे, असं मुख्यंत्री म्हणाले.

विठ्ठलाचा आशिर्वाद माझ्यामागे आहे. राज्यात मोठा दुष्काळ आहे. दुष्काळात बळीराजा आणि त्याचे पशूधन या दोघांनाही दिलासा देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी पूर्ण ताकदीने आम्ही पार पाडू असा आशिर्वाद विठ्ठलाने द्यावा असं साकडं मुख्यमंत्र्यानी घातले.

मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेपासून रोखलं होतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांनी पंढरपुरात न येण्याचा इशारा दिला होता. आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. मात्र मराठा आरक्षणासाठी पंढरपुरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी यंदा जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ दिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनीही समाजभावना लक्षात घेऊन आषाढीच्या पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातमी –  पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

संबंधित बातम्या 

पहिलं मराठा जात प्रमाणपत्र वितरित 

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला  

मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी आठवलेंच्या टिप्स 

Published On - 2:26 pm, Mon, 17 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI