5

पहिलं मराठा जात प्रमाणपत्र वितरित

औरंगाबाद/जालना: मराठा आरक्षणानंतर पहिलं जातप्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आहे. औरंगाबादेतील डोनवाडा येथील युवकाला एका दिवसात प्रमाणपत्र मिळालं. सुरेंद्र पवार या युवकाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिलं. याशिवाय जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्यालाही मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं. वैभव ढेंबरे हा अंबड […]

पहिलं मराठा जात प्रमाणपत्र वितरित
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

औरंगाबाद/जालना: मराठा आरक्षणानंतर पहिलं जातप्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आहे. औरंगाबादेतील डोनवाडा येथील युवकाला एका दिवसात प्रमाणपत्र मिळालं. सुरेंद्र पवार या युवकाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिलं.

याशिवाय जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्यालाही मराठा समाजाचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं. वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतोय. त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी या जात प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे.

मराठा आरक्षण मिळालं, पण जातीचं प्रमाणपत्र कुठे काढायचं?  

मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता रखडलेल्या मेगा भरतीला वेग आलाय. राज्यातील तब्बल 72 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. लवकरच या भरतीची जाहिरात निघणार आहे. पण आरक्षणानंतर मराठा समाजातील तरुण-तरुणींना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. या संदर्भात अनेक जण सेतू केंद्रात चौकशी करत आहेत.

आता जात प्रमाणपत्रासाठी मराठा युवकांचा संघर्ष, प्रत्येक सेतू केंद्रांवर चौकशी 

29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले. या विधेयकाला सर्व विरोधकांनीही पूर्ण पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. त्यानंतर राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं. 1 डिसेंबरपासून हे आरक्षण मराठ्यांना लागू झालं.

संबंधित बातम्या 

मराठा आरक्षण : तुमचे प्रश्न आणि घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची उत्तरं

Non Stop LIVE Update
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?