मराठा आरक्षण मिळालं, पण जातीचं प्रमाणपत्र कुठे काढायचं?

मुंबई : मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता रखडलेल्या मेगा भरतीला वेग आलाय. राज्यातील तब्बल 72 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. लवकरच या भरतीची जाहिरात निघणार आहे. पण आरक्षणानंतर मराठा समाजातील तरुण-तरुणींना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. या संदर्भात अनेक जण सेतू केंद्रात चौकशी करत आहेत. मात्र पोर्टल अजून अपडेट झालं नसल्याचं सेतू केंद्र चालकांनी सांगितलंय. […]

मराठा आरक्षण मिळालं, पण जातीचं प्रमाणपत्र कुठे काढायचं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता रखडलेल्या मेगा भरतीला वेग आलाय. राज्यातील तब्बल 72 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. लवकरच या भरतीची जाहिरात निघणार आहे. पण आरक्षणानंतर मराठा समाजातील तरुण-तरुणींना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. या संदर्भात अनेक जण सेतू केंद्रात चौकशी करत आहेत. मात्र पोर्टल अजून अपडेट झालं नसल्याचं सेतू केंद्र चालकांनी सांगितलंय. अर्ज केल्यावर किमान 40 दिवस लागत असल्याचं सेतू केंद्र चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे भरती तोंडावर आली असल्याने जात प्रमाणपत्रासाठी इच्छुकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. टीव्ही 9 मराठीने याबाबत राज्यभरातील विविध ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र कुठे दाखल करावे याची सविस्तर माहिती दिलेली आहे. पण अशी कसलीच माहिती किंवा फॉर्म अद्याप शासन दफ्तरी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील पालक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.

बीडमधील परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला. पालक आणि विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मेगा भरती जवळ आल्याने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. पण सेंतू केंद्रावर याबाबतचा फॉरमॅटच उपलब्ध नाही. 2014 मध्ये सरकारच्या पोर्टलवर मराठा आरक्षणासाठीचा जो फॉरमॅट होता, तो अजूनही बदललेला नाही. त्यामुळे सेतु सुविधा केंद्र चालक आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी लागणारी माहिती भरू शकत नाहीत.

परभणी जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. तरुण-तरुणी तहसील आणि सेतू सुविधा केंद्रावर गर्दी करत आहेत. पण जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारकडून अजून कोणताच आदेश आला नसल्यामुळे सेतू सुविधा केंद्र चालकही हतबल आहेत. सरकारने यावर तातडीने उपाय शोधण्याची मागणी होत आहे. अन्यथा ऐन मेगा भरतीच्या तोंडावर गर्दीचा सामना करावा लागणार हे नक्की आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.