Corona | ‘गो कोरोना!’ बालकलाकार नित्याचा कोरोनापासून बचावाचा फंडा

| Updated on: Mar 21, 2020 | 2:10 PM

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता आता अनेकांनी हा विषय गांभिर्याने घेण्यास सुरुवात केली आहे.

Corona | गो कोरोना! बालकलाकार नित्याचा कोरोनापासून बचावाचा फंडा
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता (Nitya Moyal Go Corona Dance) आता अनेकांनी हा विषय गांभिर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना हा किती घातक असू शकतो हे लोकांना कळायला लागलं आहे. त्यामुळे अनेकजण आता आपआपल्यापरीने (Nitya Moyal Go Corona Dance) इतरांना याबाबत जाग्रृत करण्याचं काम करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी या विषाणूपासून कशाप्रकारे स्वत: बचाव केला जाऊ शकतो याबाबत पोस्ट करत आहेत. यामध्ये आता लहानग्या कलाकारांनाही सहभाग घेण्यास सुरुवात केली असून ते त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या विषाणूबाबत माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत.

हेही वाचा : PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी

यादरम्यान, बालकलाकार म्हणून काम करणारी नित्या मोयलचा एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडत आहे. यामध्ये ती ‘गो कोरोना गो’वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने अत्यंत गोंडस पद्धतीने (Nitya Moyal Go Corona Dance) कोरोनापासून बचावासाठी काय करावे हे सांगतिलं आहे.

व्हिडीओमध्ये डान्सनंतर ती म्हणते, “कोरोनापासून बचावासाठी आपले हात नेहमी स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क घाला. तसेच, या रविवारी कुठेही बाहेर पडू नका घरातच राहा”, असं आवाहनही तिने या व्हिडीओतून केलं आहे.

नित्याच्या या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. तसेच, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

22 मार्चला जनता कर्फ्यू

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Live) हे देशातील जनतेला 8 वाजता संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळा असे आवाहन केले. यावेळी “सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Nitya Moyal Go Corona Dance

संबंधित बातम्या :

Corona | कोरोनाची खबरदारी! रवीना टंडनने स्वत: रेल्वेची बर्थ पुसली

अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का

नरेंद्र मोदींच्या आवाहनावर अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पंचनामा’