AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | कोरोनाची खबरदारी! रवीना टंडनने स्वत: रेल्वेची बर्थ पुसली

या व्हिडीओमध्ये रवीनाने तोंडाला मास्क लावला आहे आणि ती रेल्वे प्रवासादरम्यान तिचं बर्थ स्वच्छ करताना दिसत आहे.

Corona | कोरोनाची खबरदारी! रवीना टंडनने स्वत: रेल्वेची बर्थ पुसली
| Updated on: Mar 21, 2020 | 12:59 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा (Raveena Tandon Video Viral) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाने तोंडाला मास्क लावला आहे आणि ती रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रवीना (Raveena Tandon Video Viral) रेल्वेमधील तिचं बर्थ स्वच्छ करताना दिसत आहे.

देशासह जगभरात सध्या कोरोना या विषाणूने दहशत पसरवली आहे. देशातील अनेक राज्य जवळपास लॉक डाऊन करण्यात आले आहेत. यादरम्यान, फक्त अत्यावश्यक सेवा आणि अतिशय महत्त्वाच काम असल्यास घरातून बाहेर पडावं असे आदेश देण्यात आले आहेत. नागरिक या आदेशाचं पालनही करताना दिसत आहेत. मात्र, ज्यांना अगदी महत्त्वाचं काम असेल आणि घराबाहेर पडावं लागत असेल तर तुम्ही स्वत:ला कोरोनापासून कशाप्रकारे वाचवू शकता, याबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडीओ रवीना टंडनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

हेही वाचा : अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का

हा व्हिडीओ शेअर करताना रवीना टंडनने याला एक सल्ला देणारं कॅप्शन दिलं.

“ट्रेनने प्रवास करताना पहिल्यांदा केबिनला वेट (Raveena Tandon Video Viral) वाईप्स आणि सॅनिटायझरने विषाणूरहित करत आहे, त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल होऊ. माफीपेक्षा सुरक्षित राहिलेलं कधीही चांगलं. अत्यावश्यक असल्यावरच प्रवास करा. कृपया स्वत:ला आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या सुरक्षेला प्रधान्य द्या”, असं कॅप्शन तिने तिच्या पोस्टला दिलं. रवीनाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. लोक यावर अनेक चांगल्या कमेंट करत आहेत.

आतापर्यंत कोरोना विषाणूचा देशातील 258 जणांना संसर्ग झाला आहे. शुक्रवारी देशात कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या सर्वाधिक होती. शुक्रवारी कोरोनाची लागण झालेले 63 नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर या विषाणूमुळे आतापर्यंत देशात 4 जणांचा बळी गेला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 10
  • मुंबई – 21
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 2
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1
  • एकूण 63

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (1) – 21 मार्च
  • मुंबई (10) – 21 मार्च
  • एकूण – 63 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Raveena Tandon Video Viral

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदींच्या आवाहनावर अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पंचनामा’

Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोप

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.