Chiplun rain | घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, चिपळूणमध्ये पावसाचा कहर

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा पहिला बळी गेला आहे. दुर्दैव म्हणजे घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुमार चव्हाण असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.

Chiplun rain | घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, चिपळूणमध्ये पावसाचा कहर
Follow us
| Updated on: Aug 04, 2019 | 9:01 PM

रत्नागिरी : राज्यभर पावसाने हाहा:कार माजवला असताना, कोकणात तर पाऊस जीवघेणा ठरत आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यभरात पाणी पाणी केलं असताना, कोकणातील परिस्थिती भीषण झाली आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाचा पहिला बळी गेला आहे.

दुर्दैव म्हणजे घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुमार चव्हाण असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. चिपळूणमधील बहादूरशेख नाका (bahadur shaikh naka chiplun) परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

पावसामुळे बहादूरशेख नाका परिसराला तलावाचं रुप आलं आहे. घरात पाणी शिरल्यामुळे, घरातील प्रापंचिक साहित्य वाचवण्यासाठी आणि ते सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कुमार चव्हाण घरात गेला. मात्र घरात आधीच पाणी भरलं होतं. त्या पाण्याचा अंदाज न आल्याने कुमार चव्हाण घरातील पाण्यातच बुडाला.

बहादूरशेख नाका हा चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या बाजूलाच आहे. या नदीला पूर आल्याने या नाक्यावर पाणी भरलं. गेल्या आठवड्यात रविवारीच इथे पाणी भरलं होतं. आजही इथे पाच फुटापेक्षा जास्त पाणी भरलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच घरात पाणी गेलं आहे.घरं पाण्यात गेल्यानंतर, साहित्य तरी वाचवावं म्हणून कुमार घरात गेला होता. मात्र त्याच्यावर काळाने घाला घातला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.