भुईमुगाच्या शेंगा आणि मटणातून 45 लाखांचं परदेशी चलन जप्त, दिल्ली विमानताळावरुन तस्कराला अटक

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF ) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात परदेशी चलन जप्त केलं आहे. याची किंमत 45 लाख रुपये आहे.

भुईमुगाच्या शेंगा आणि मटणातून 45 लाखांचं परदेशी चलन जप्त, दिल्ली विमानताळावरुन तस्कराला अटक
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 4:35 PM

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF ) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात परदेशी चलन जप्त केलं आहे. याची किंमत 45 लाख रुपये आहे (CISF Detects Foreign Currency). सीआयएसएफच्या जवानांनी विमानतळावर तपासादरम्यान ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हे परदेशी चलन भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटं आणि मटणच्या आत लपवून आणलं होतं (Currency Concealed In Eatable Items).

दुबईहून एअर इंडियाचं फ्लाईट – AI 995 दिल्लीला उतरलं. यानंतर फ्लाईटमधून उतरुन एक प्रवासी अत्यंत घाईघाईत विमानतळाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे हावभाव होते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून संशयाच्या आधारे विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांनी त्याला थांबवलं (Foreign currency smuggling). जेव्हा या व्यक्तीच्या बॅगची झडती घेण्यात आली तेव्हा त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटं आणि मटण पीसचे पाकिटं ठेवलेले होते. मात्र, संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भीतीचे हावभाव पाहून सुरक्षा रक्षकांचा संशय वाढला आणि त्यांनी हे सर्व सामान एक्स-रे मशीनमध्ये ठेवले.

त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी भुईमुगाच्या शेंगा फोडून पाहिल्या. भुईमुगाच्या शेंगा फोडल्यानंतर त्यातून जे निघालं ते पाहून जवान आवाक झाले. कारण, या भुईमुगाच्या शेगांमध्ये शेंगदाण्यांच्या जागी परदेशी चलन लपवून ठेवण्यात आले होते. त्याशिवाय, बिस्किटच्या पाकिटातही परदेशी चलन गुंडाळून ठेवण्यात आलं होतं. तर मटणातही परदेशी चलन लपवण्यात आलं होतं.

सीआयएसएफच्या जवानांनी भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटं आणि मटण पीसचे पाकिटं यामधून जवळपास 45 लाख रुपये किमतीचं परदेशी चलन जप्त केलं. यामध्ये सौदी अरब, कतार, कुवैत दिनार आणि ओमानी रियाल आणि यूरोसारख्या परदेशी चलनाचा समावेश आहे.

याप्रकरणी सीआयएसएफच्या जवानांनी संबंधित व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीचं नाव मुराद आलम असून तो भारतीय असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुराद हा खाण्याच्या वस्तुंमध्ये परदेशी चलन लपवून ते भारतात आणत होता. यामागे त्याचा काय उद्देश होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.