महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी : उद्धव ठाकरे

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्याग, समर्पणामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी झाली, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं (CM Uddhav Thackeray on Mahatma Phule Birth Anniversary).

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी : उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 11, 2020 | 6:12 PM

मुंबई : पुरोगामीत्वाचे अध्वर्यू क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या ध्यासपर्वातील महाराष्ट्र घडवण्यासाठी, पर्यायाने राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी कटीबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना 193 व्या जयंती निमित्त अभिवादन केले (CM Uddhav Thackeray on Mahatma Phule Birth Anniversary). तसेच क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्याग, समर्पणामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी झाली, असं मत व्यक्त केलं. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीतून आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्याग, समर्पणामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी झाली. महात्मा जोतीराव हे बहुआयामी होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या उत्थानासाठी अपूर्व योगदान दिले. विचारवंत, लेखक, साहित्यिक, कवी याशिवाय उत्तम शेतकरी, उद्योजक, व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून महात्मा जोतीराव यांनी ठसा उमटवला. ब्रिटीश साम्राज्यालाही त्यांनी आव्हान दिलं. महात्मा फुले यांनी ब्रिटीशांनाही खडे बोल सुनावले.”

दिडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी आपल्या कामातून आधुनिक राष्ट्र उभारणीची दूरदृष्टी मुर्त स्वरुपात आणली. त्यातूनच त्यांनी त्या काळात पायाभूत सुविधा क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. या कामातून मिळालेल्या धनाचा विनियोग त्यांनी सामाजिक कामांसाठी केला. त्यांच्या ध्यासपर्वातील राष्ट्र उभारणीत योगदान देणे, हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

संबंधित बातम्या :

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

CM Uddhav Thackeray on Mahatma Phule Birth Anniversary