शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

शेतकऱ्यांविरोध वक्तव्य केल्याने कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (complaint registered in Karnataka against Bollywood actress Kangana Ranaut)

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल
| Updated on: Sep 26, 2020 | 7:33 PM

बंगळुरु : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने ट्विट करत शेकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारदाराने तक्रारित केला आहे. (complaint registered in Karnataka against Bollywood actress Kangana Ranaut)

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांना देशभरात विरोध होतोय. कंगनाने कृषी विधेयकांचे समर्थन करत ट्विट केले होते. देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांवर तिने आपल्या ट्विटमध्ये भाष्य केले.  याच ट्विटमुळे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप कंगनावर झाला आहे. आता हेच ट्विट कंगनाला चांगलंच भोवल्याचं दिसतंय. कर्नाटकातील तुमकुर येथे कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रस्तावित विधेयकं शेतकरी हिताची नसून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधणारी आहेत, असा आरोप देशभरातील शेतकऱ्यांकडून होतोय. प्रस्तावित विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं, तर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असा सूरही आळवला जातोय.  त्यामुळे विधेयकांविरोधात देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलनं होताना दिसत आहेत. याच विधेयकांमुळे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता.

 

Sunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते….

दरम्यान, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणापासून कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. मुंबई पोलिसांविरोधात वक्तव्य केल्यानेही कंगनाला महाराष्ट्रातून मोठा विरोध झाला होता.  मुंबई पोलिसांरवर टीका केल्यामुेळे कंगना आणि महाराष्ट्र सरकारमध्येही चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुंबई पालिकेने कंगनाचं कार्यालय पाडल्यानेही मोठा वाद झाला होता. हा वाद संपत नाही तोच कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ असा उल्लेख केला होता.

संबंधित बातम्या :

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

‘भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा’, बीएमसी उच्च न्यायालयात आक्रमक

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

#Metoo against Anurag Kashyap | #Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा

“पॉर्न स्टार आक्षेपार्ह कसे? सनी लिओनला पाहा” उर्मिला मातोंडकरांवरील टीकेनंतर कंगनाची सारवासारव

(complaint registered in Karnataka against Bollywood actress Kangana Ranaut)