Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

मी भांडण सुरु करत नाही, तर नेहमी ते संपवण्याचा प्रयत्न करत असते, असं ट्विट कंगना रनौतने केलं आहे. (Kangana Ranaut says I finish every fight)

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही दिवसांपासून कंगनाचे ट्विटसत्र सुरुच आहे. आता तिने आपण कधीही वाद सुरु करत नाही, तर तो वाद मी संपवतो अशा आशयाचे ट्विट केले आहे. कंगना म्हणाली, “मला भांडखोर मुलगी समजलं जातं , पण ते खरे नाही. मी आतापर्यंत स्वत: कधीही भांडण सुरु केलेले नाही. जर तसं कुणी सिद्ध केले तर मी ट्विटर बंद करेन. मी भांडण सुरु करत नाही, तर नेहमी ते संपवण्याचा प्रयत्न करत असते. कृष्णाने सांगितले आहे की, “जर कुणी तुम्हाला लढण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्यांना नाही म्हणू नका” “. (I never start a fight but I finish every fight, says Kangana Ranaut)

मी क्षत्रीय, शीर झुकणार नाही

दरम्यान, यापूर्वीही कंगनाने ट्विटची मालिका केली होती. “मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं करु शकते, पण ते कोणासमोर झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन. मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगते. राष्ट्रवादी बनून अभिमानाने जगते. तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, ना ही करेन, जय हिंद!” असं ट्वीट कंगनाने केलं होतं.

मागील काही दिवसापासून कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. “मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, मुंबई आता पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटायला लागली आहे.” असे विधान केल्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

चाहत्यांनीच नाही तर विविध कलाकारांनीसुद्धा कंगनाला सुनावले होते. तर नुकतच तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’असल्याची हीन भाषेतील टीकासुद्धा केली होती. एव्हढंच नाही तर आता अभिनेत्री कंगना आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याशीही वाद सुरु झाला आहे.

(I never start a fight but I finish every fight, says Kangana Ranaut)

संबंधित बातम्या 

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *