मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानं करत सुटली आहे.कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त ट्वीट करत आहे. (Kangana Ranaut Kshatriya)

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानं करत सुटली आहे. कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त ट्वीट करत आहे. दिवसभरात अनेक ट्विट करुन कंगना स्वत:कडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कंगनाने आजही ट्विट केलं आहे. “मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं केलं तरी चालेल, पण ते झुकणार नाही”, असं कंगना म्हणाली. (I am Kshatriya. I can cut my head, but I cannot bow my head! Says Kangana)

“मी क्षत्रीय आहे, शीर धडावेगळं करु शकते, पण ते कोणासमोर झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन. मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगते. राष्ट्रवादी बनून अभिमानाने जगते. तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, ना ही करेन, जय हिंद!” असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिरशी केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात कंगनाविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तो वाद अजूनही सुरुच आहे.

मुंबईबद्दल केलेल्या वक्तवव्यानंतर ठाकरे सरकारसोबत कंगनाचा वाद मोठ्या प्रमाणात ताणला गेला आहे. एकीकडे कंगना माघार घेण्यासाठी तयार नाहीच, मात्र दुसरीकडे ती महाविकास आघाडी सरकारविरोधात जाहीर विधानंही करत आहे.

उर्मिला मातोंडकरवर वार

प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची हीन भाषेतील टीका अभिनेत्री कंगना रनौत हिने केली आहे. कंगनाने तोंडसुख घेतल्यानंतर मनोरंजन विश्वातून उर्मिला मातोंडकर यांची पाठराखण केली जात आहे.

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या होत्या?

“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

संबंधित बातम्या  

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली 

“पॉर्न स्टार आक्षेपार्ह कसे? सनी लिओनला पाहा” उर्मिला मातोंडकरांवरील टीकेनंतर कंगनाची सारवासारव

Kangana Ranaut | बॉलिवूडमध्ये चित्रपटात भूमिकेसाठी हिरोशी शय्यासोबत करावी लागते: कंगना रनौत

Kangana Ranaut | कंगना रनौतचा BMC वर बेकायदेशीरपणे बांधकाम पाडल्याचा आरोप, 2 कोटींच्या भरपाईची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *