‘कोरोना लस राक्षसाकडून आलीय’, दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य न्यायाधीशांचं अजब वक्तव्य
दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) मुख्य न्यायाधीश मोगोइंग मोगोइंग यांनी तर जग वाट पाहत असलेली कोरोना लस राक्षसाकडून आलेली आहे, असं अजब वक्तव्य केलं आहे.
केपटाऊन : कोरोनाचा हाहाकार सुरु असताना संपूर्ण जगाचं लक्ष कोरोना नियंत्रण करणाऱ्या लसीवर (Corona Vaccine) आहे. काही देशांनी तर कोरोना लसीला मंजूरीही दिली आहे. इंग्लंडमध्ये तर लसीकरण अभियानालाही सुरुवात झाली आहे. मात्र, जगातील काही भागात कोरोना लसीवर वादही होताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) मुख्य न्यायाधीश मोगोइंग मोगोइंग यांनी तर जग वाट पाहत असलेली कोरोना लस राक्षसाकडून आलेली आहे, असं अजब वक्तव्य केलं आहे. यामुळे कोरोना लसीवरील चर्चेला उधाण आलं आहे. वैज्ञानिकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे (Controversial statement on Corona vaccine by South Africa Chief Justice).
सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य न्यायाधीश मोगोइंग यांचा एक व्हिडीओ वेगाने शेअर केला जात आहे. यात न्यायमूर्ती मोगोइंग एका चर्चमध्ये प्रार्थना करत आहेत. यात ते म्हणतात, “जग मोठ्या उत्सुकतेने ज्या कोरोना लसीची वाट पाहत आहेत ती लस राक्षसाकडून आली आहे. या लसीमुळे लोकांचा डीएनए ‘खराब’ होईल. जी कोरोना लस देवाकडून आलेली नाही अशी कोणतीही लस मी घेणार नाही. या लसीपासून मी दूर राहिल.”
“सध्या ज्या कोरोना लस आहेत त्या राक्षसाकडून आलेल्या आहेत. त्यांचा उद्देश लोकांच्या जीवनात ‘ट्रिपल सिक्स’ (राक्षसाचं निशाण) तयार करणं हेच आहे. यामुळे लस घेणाऱ्याचा डीएनए खराब होईल. देवाने अशी कोणतीही लस नष्ट करावी,” असंही मोगोइंग यांनी म्हटलं. मोगोइंग यांच्या या दाव्यावर वैज्ञानिकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोगोइंग यांच्यासारखे प्रभावी व्यक्ती असं वक्तव्य करत असतील तर कोरोना लसीची वाट पाहणाऱ्या लोकांची दिशाभूल होईल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
विट्स विद्यापीठाचे व्हायरोलॉजीचे प्राध्यापक बॅरी शऊब म्हणाले, “मोगोइंग यांच्या उंचीचा व्यक्ती लोकांची दिशाभूल करत आहे हे खूपच दुर्दैवी आहे. कोरोना साधीरोगाचं नियंत्रण करण्यासाठी लस हा महत्त्वाचा भाग आहे. मोगोइंग यांच्यासारखा प्रभावशाली व्यक्ती कोरोना नियंत्रणाच्या या कामाला विरोध करत आहे हे दुखद आहे.”
मानवाधिकार संघटना ‘आफ्रिका4पॅलस्टीन’ने मोगोइंग यांच्या या विधानावर टीका केली आहे. असं असलं तरी दुसरीकडे न्यायमूर्ती मोगोइंग यांनी आपल्यावरील टीका फेटाळली आहे. ते म्हणाले, “मला माझे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा स्वतंत्र देश आहे. माझी कुणीही मुस्कटदाबी करु शकत नाही. मला यानंतरच्या परिणामांची काळजी नाही.”
हेही वाचा :
जगभरात लसीचं स्वागत पण नागपूरच्या डॉक्टरांना कशाची भीती ?
कोरोनाची लस लहान मुलांसाठी कितीपत फायदेशीर?, पाहा डॉक्टर काय सांगतात
कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ लावण्याची अफवा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…
व्हिडीओ पाहा :
Controversial statement on Corona vaccine by South Africa Chief Justice