Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

| Updated on: Mar 15, 2020 | 9:48 AM

कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकाने तब्बल साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं जमिनीत पुरली.

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट
Follow us on

कोल्हापूर : कोरोना (Novel Corona Virus) या जीवघेण्या आजाराने (Corona Effect on Poultry Farm) जगभरात हाहा:कार माजवला आहे. या विषाणूचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर अनेक व्यवसायांवरही झाला आहे. कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकाने तब्बल साडेतीन लाख (Corona Effect on Poultry Farm) कोंबडीची पिल्लं जमिनीत पुरली. तर 2 लाख अंडीही केली नष्ट केली.

चिकन खाल्ल्याने कोरोना आजार पसरतो अशी (Corona Effect on Poultry Farm) अफवा पसरली होती. त्यामुळे राज्यातील चिकन व्यावसायिकांवर मोठं संकट आलं. राज्यात चिकनचे दर 200 वरुन थेट 50 ते 60 रुपये प्रति किलोवर आले. काही ठिकाणी तर एक कोंबडी 10 रुपयाला विकण्याची वेळ चिकन व्यावसायिंकांवर आली.

हेही वाचा : Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

या परिस्थितीचा मोठा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी मधील अंकिता पोल्ट्री फिड्स या फर्मच्या (Corona Effect on Poultry Farm) मालकाने तब्बल साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं जमिनीत पुरली. तर 2 लाख अंडीही केली नष्ट केली. आर्थिक अडचणीमुळे या व्यावसायिकाने हे टोकाचे पाऊल उचलले.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

राज्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वरुन 31 वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड या ठिकाणी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

Corona Effect on Poultry Farm

संबंधित बातम्या :

CoronaVirus: कोरोना संसर्ग झालेल्या अधिकाऱ्याची भेट, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी

Corona Virus Update | पुण्यात 15 जणांना कोरोनाची लागण, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी