स्वत:च्या फायद्यासाठी ट्रम्प यांच्याकडून पदाचा गैरवापर; त्यांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केलं : बराक ओबामा

| Updated on: Nov 03, 2020 | 10:58 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा वापर फक्त स्वत:च्या फायद्यासाठी केला, असे म्हणत ट्रम्प यांनी कोरोना महामारीला गंभीरपणे घेतलं नसल्याचा आरोप बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केला.

स्वत:च्या फायद्यासाठी ट्रम्प यांच्याकडून पदाचा गैरवापर; त्यांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केलं : बराक ओबामा
Follow us on

वॉशिंग्टन :  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील मिशिगन येथील प्रचारसभेदरम्यान सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांच्यावर टीका केली आहे. (Corona epidemic did not taken seriously by Donald Trump criticized by Barack Obama)

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा वापर फक्त स्वत:च्या फायद्यासाठी केला, असे म्हणत ट्रम्प यांनी कोरोना महामारीला गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप बराक ओबामा यांनी केला. तसेच मागील चार वर्षांपासून ट्रम्प यांनी कोणत्याही नागरिकाची मदत केली नाही, असं देखील ओबामा म्हणाले. ते मिशिगन येथे प्रचारासभेत बोलत होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन निवडणुकीच्या मैदानात आहेत. बिडेन यांनाच  राष्ट्राध्यक्ष पदाची खुर्ची मिळावी म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी चांगलीच कंबर कसली आहे. मिशिगन येथे प्रचारसभेत बोलताना ओबामा यांनी बिडेन यांचे विरोधक ट्रम्प यांच्यावर चांगलीच टीका केली. ते म्हणाले “राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष स्वता:चा स्वार्थ साधण्याकडेच जास्त आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ऊमेदवार जो बिडेन हे शालिनतेकडे जास्त लक्ष देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीच दुसऱ्यांना मदत करण्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाला एका रियालिटी शो समजून त्याचा उपयोग केला. त्यांच्या अशा वागण्याचेच सामान्य जनतेला वाईट परिणाम भोगावे लागत आहेत.”

मिशिगन येथे ओबामा यांच्यासोबत जो बिडेनदेखील उपस्थित होते. बिडेन यांच्याविषयी बोलताना ते माझे भाऊ असून माझ्यासाठी अत्यंत प्रिय व्यक्ती आहेत, असं ओबामा म्हणाले. तसेच, त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाविषयी सांगताना, देशाला प्रगत बनवण्यासाठी त्यांच्याकडे चांगला अनुभव त्यांनी जनतेला सांगितलं.

दरम्यान, ट्रम्प आणि बिडेन दोघेही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत असल्याचं दिसत आहे. येत्या 3 तारखेला अमेरिकेत मतदान होणार आहे. त्यानंतरच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरतील.

संबंधित बातम्या :

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रेड स्टेट, पर्पल स्टेट, डेलीगेटस्, काँग्रेस नक्की काय आहेत या संज्ञा?

ट्रम्प यांच्या 18 रॅलीतील 30 हजाराहून अधिक सहभागींना कोरोना, 700 जणांचा मृत्यू : अहवाल

(Corona epidemic did not taken seriously by Donald Trump criticized by Barack Obama)