AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात संभाव्य मतदारांपैकी 52 टक्के लोकांनी माजी उपाध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर ट्रम्प यांना 44 टक्के पाठिंबा मिळाला आहे.

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर - सर्वे
| Edited By: | Updated on: Oct 31, 2020 | 7:17 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. या सगळ्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर 8 गुणांनी आघाडीवर आहेत. हिल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार, शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात संभाव्य मतदारांपैकी 52 टक्के लोकांनी माजी उपाध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर ट्रम्प यांना 44 टक्के पाठिंबा मिळाला आहे. (us election 2020 biden leading nationwide by 8 points with donald trump survey)

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोन टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं समर्थन करतील. तर इतर 2 टक्के लोकांनी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणाव्यतिरिक्त, अन्य सर्वेक्षणांमध्येही बायडेन यांना अध्यक्षपदाची धुरा मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी हिल न्यूज वेबसाइटने जाहीर केलेल्या सीएनएन सर्वेक्षणात बायडेन यांना 54 टक्के मतदारांनी पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर 42 टक्के मतदारांनी अध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार शिगेला दरम्यान, अमेरिकतील राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडूण आल्यास कोरोना विषाणू वरील लस सर्वांना मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या राष्ट्रीय रणनितीचा भाग असेल, असे बायडेन यांनी सांगतिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कोरोनावरिल लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते.

जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्र सोडले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप बायडेन यांनी केला. त्यामुळे आता या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या – 

सर्वसामान्यांसाठी ‘गोड’ बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(us election 2020 biden leading nationwide by 8 points with donald trump survey)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.