Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

जर कोरोना रुग्ण घरातच क्वारंटाईन असेल तर नाही म्हटलं तरी त्याचा कुटुंबाशी संपर्क होतो. बोलताना, मस्ती सुरू असताना आपण मोठ्याने श्वास घेतो आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 10:01 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Corona) धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. रोज नव्याने कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. या सगळ्यात कोरोनाच्या लक्षणांमध्येही वारंवार बदल होत गेले. सध्या कोरोना झाल्यानंतर घरातच क्वारंटाईन (Quarantine)होण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यासाठी आपलं घरंही योग्यरित्या सॅनिटाईझ होणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या संसर्गाचा कुटुंबातील इतरांना धोका होऊ शकतो. (corona risk is more in in closed house know how to improve air quality in home Quarantine)

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोरोना रुग्ण घरातच क्वारंटाईन असेल तर नाही म्हटलं तरी त्याचा कुटुंबाशी संपर्क होतो. बोलताना, मस्ती सुरू असताना आपण मोठ्याने श्वास घेतो आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पण यावर घरात आपण कशी काळजी घेतली पाहिजे याच्या काही महत्त्वाच्या सूचना समोर आल्या आहेत.

अमेरिकेची हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना विषाणूचा प्रसार हा हवेत तरंगणार्‍या लहान विषाणूच्या कणांमधूनही होऊ शकतो. याचं कारण म्हणजे वेंटिलेशनची कमतरता. यामुळे कोरोनातून वाचण्यासाठी घरात चांगलं वातावरण आणि हवा खेळती असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात शक्य तितक्या वेळी खिडक्या आणि दारं उघडून ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात स्वच्छता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पिण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करा तर पौष्टिक अन्न खाणंदेखील महत्त्वाचं आहे.

रात्री झोपताना खिडक्या खोलून झोपा रात्री झोपताना खिडक्या थोड्याफार उघड्या ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा. यातून घरातली हवा खेळती राहते. इतकंच नाही तर रात्री मानवी हालचाल कमी असल्यामुळे हवा शुद्ध असते. यामुळे घरातील हवेची क्वालिटीदेखील चांगली होते. पण थंडीत मात्र हा उपाय करताना काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.

(corona risk is more in in closed house know how to improve air quality in home Quarantine)

किचन आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट पंखा लावा घरातील हवा सुधारण्यासाठी अनेक उपकरणं बाजारात आहेत. त्याचा चांगला वापर करता येईल. त्यामुळे किचन आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट पंखा लावण्याचा प्रयत्न करा.

घरातच्या आत झाडं लावू शकता घरातील खराब हवेचा चांगली करण्यासाठी तुम्ही वनस्पतींचा वापर करू शकता. खोलीच्या आत ठेवलेली झाडं हवेची गुणवत्ता सुधारण्यात खूप उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतींमुळे कार्बन डाय ऑक्साईडची पातळी घरातील घातक विषारी पदार्थ कमी करण्यासाठी मदत करतात.

इतर बातम्या – 

Flipkart आणि Amazon सगळ्यात मोठा सेल, ‘या’ फोनवर मिळणार 10 हजारांपर्यंत डिस्टाऊंट

पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 तरुणांना वाहनाची धडक, जागीच मृत्यू

(corona risk is more in in closed house know how to improve air quality in home Quarantine)

Non Stop LIVE Update
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.