ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना परवानगी, मात्र जिल्हाबंदी कायम : उद्धव ठाकरे

| Updated on: Apr 19, 2020 | 2:33 PM

व्हायरसची वाहतूक करायची नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Economic Activities In Maharashtra Orange-Green Zone) म्हणाले.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना परवानगी, मात्र जिल्हाबंदी कायम : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Economic Activities In Maharashtra Orange-Green Zone) आहे. सुदैवाने काही जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी उद्योगधंदे सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान (CM Uddhav Thackeray) याबाबतची माहिती दिली.

कोरोनामुळे 20 एप्रिलपासून अर्थचक्र रुतलं आहे. कोरोनाच्या (Economic Activities In Maharashtra Orange-Green Zone) संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको. हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे. त्यामुळे काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

काही जिल्हे शून्य रुग्णाचे आहेत. काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज , ग्रीन असे झोंन केले आहेत. त्यामुळे अशा काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असला, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करीत असाल तर मान्यता मिळेल, असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

शेती आणि कृषी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

येत्या 20 एप्रिलनंतर काही प्रमामात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान 3 मे पर्यंत हे बंधन आहे. मला अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, माल यांची वाहतूक करायची आहे. व्हायरसची वाहतूक करायची नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यातील जिल्ह्यात तुम्ही ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

मी पत्रकार बांधवाना सांगतोय. वितरणावर बंदी नाही, स्टॉल्सला परवानगी आहे. मात्र घरोघरी जाऊन वितरण नको. माझी भीती अनाठायी असेलही. तुम्ही मी चांगले काम करतो म्हणून कौतुक करीत आहात पण आपण टीकाही केली तरी महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा ही स्वीकारेल, असेही उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

ही आरोग्य आणीबाणी आहे आणि त्यात मला धोका पत्करायचा नाही. मी काही संपादक आणि मालक यांच्याशीही बोलून त्यांना समजावून संगितले आहे. नागरिकांनी खूप आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी (Economic Activities In Maharashtra Orange-Green Zone) केलं.