AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मिरी तरुणाला गाडीला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं कोर्ट मार्शल

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीदरम्यान सुरक्षित जाण्यासाठी काश्मिरी तरुणाला गाडीला बांधून नेणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांचं कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. मात्र, त्यांचं कोर्ट मार्शल तरुणाला गाडीला बांधून नेण्याच्या प्रकरणात नसून, श्रीनगर येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याच्या प्रकरणात झालं आहे. दिल्लीतील या प्रकरणात मेजर लितुल गोगोई दोषी आढळल्याने त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं. मेजर लितुल गोगोई यांची […]

काश्मिरी तरुणाला गाडीला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं कोर्ट मार्शल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीदरम्यान सुरक्षित जाण्यासाठी काश्मिरी तरुणाला गाडीला बांधून नेणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांचं कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. मात्र, त्यांचं कोर्ट मार्शल तरुणाला गाडीला बांधून नेण्याच्या प्रकरणात नसून, श्रीनगर येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याच्या प्रकरणात झालं आहे. दिल्लीतील या प्रकरणात मेजर लितुल गोगोई दोषी आढळल्याने त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं.

मेजर लितुल गोगोई यांची काश्मीरच्या बाहेर बदली  केली जाणार आहे. तसेच त्यांची सैन्यातील वरिष्ठता सहा महिन्यांनी कमी करण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

मेजर लितुल गोगोई आणि त्यांच्या ड्राइव्हरने 23 मे 2018 रोजी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. त्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. गोगोई त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा सगळा घडला होता.

मेजर गोगोई आधीही चर्चेत

मेजर लितुल गोगोई हे एप्रिल 2017 मध्ये चर्चेत आले होते. काश्मीरमधील बडगाम येथे पोटनिवडणुकीच्या दरम्यान काही लोक दगडफेक करत होते. तेव्हा स्वतः वाचण्यासाठी मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्यांपैकी एकाला गाडीच्या पुढे बांधले आणि स्वतःची गाडी पुढे घेऊन गेले होते. त्या तरुणाचा ढालीसारखा वापर मेजर गोगोई यांनी केला होता. त्यावेळी या घटनेची मोठी चर्चा झाली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...