राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे

| Updated on: Nov 12, 2020 | 2:39 PM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली आहे. याचा अर्थ लाट येईलच असे नाही, अशी सारवासारव करतानाच ही लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे
Follow us on

औरंगाबाद: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली आहे. याचा अर्थ लाट येईलच असे नाही, अशी सारवासारव करतानाच ही लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विधान राजेश टोपे यांनी केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे यांनी ही सारवासारव केली. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण लाट आली तरी प्रशासन सज्ज आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोरोना लसीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना लसीबाबतची पूर्ण तयारी झाली आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची यादी तयार झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे, असंही ते म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लस आलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला लस कधी उपलब्ध होणार याबाबत आम्ही देशाच्या आरोग्यमंत्र्यांकडून माहिती मागवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, टोपे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणं झालं. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचं फटाके विरहित दिवाळी साजरी केली जावी असं म्हणणं पडलं. त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं होतं. फटाक्यांमुळे कुणालाही श्वसनाचा त्रास उद्भवणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्याचंही ते म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

Rajesh Tope | फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | राज्यात यंदा फटाक्यावर बंदी येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

(COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)