गायीचं डोहाळे जेवण, संपूर्ण गावाला आणि नातेवाईकांना पत्रिका छापून निमंत्रण

पंढरपूर : तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील आढेगावात डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची… खरं वाटत  नाही ना? पण हे खरंय. पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन साजरा केला. यासाठी त्यांनी चक्क […]

गायीचं डोहाळे जेवण, संपूर्ण गावाला आणि नातेवाईकांना पत्रिका छापून निमंत्रण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

पंढरपूर : तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील आढेगावात डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची… खरं वाटत  नाही ना? पण हे खरंय. पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन साजरा केला. यासाठी त्यांनी चक्क पत्रिका वाटून गावकऱ्यांसह पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.

आढेगावमधील 30 लोकांचे एकत्र कुटुंब असलेले शेतकरी अंगत निकम आणि त्यांची पत्नी लक्ष्मी निकम यांनी संपूर्ण गावासाठी आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या कमला गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी 500 पत्रिका छापून लोकाना आमंत्रित केलं. डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटनं आलंच. या गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसुत्र  घालून छान नटवण्यात आलं.

गोडधोड पदार्थांचा घरात घमघमाट सुटला. गावातल्या आया-बाया डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी निकम यांच्या घरी जमा झाल्या. डोहाळ कार्यक्रमाची वेळ झाली. गौरीला मंडपात बांधण्यात आलं. लाऊडस्पिकरवर जोरजोरात गाणी लावण्यात आली. एकएक करत 21 महिलांनी गौरीची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर पाच प्रकारची फळे गौरीला खाऊ घालण्यात आली आणि त्यानंतर ह .भ प. महेश महाराज शिंदे यांनी आपल्या रसाळ वाणीने गीर गायीचे महत्त्व जमलेल्या लोकांना सांगितले. त्यानंतर डोहाळे जेवणाच्या पंक्तीही बसल्या.

अंगद निकम यांची आढेगाव गावाजवळ तीन एकर शेती आहे. पण जेव्हा गीर जातीची गौरी नावाची गाय घेतली त्या दिवसापासून निकम यांची शेतीत प्रगती होऊ लागली. गौरी गायीच्या शेण आणि गोमुत्राचं पाणी करून ते आपल्या पिकाला देऊ लागले. ऊसाचे उत्पादन पहिल्यापेक्षा दुपटीने निघू लागले. मिरच्या, टोमॅटो  पिकांच्या उत्पादनात यामुळे चांगली वाढ झाल्याचं ते सांगतात. गायीच्या दूधातूनही आर्थिक बाजूही सावरली. गरीब असणाऱ्या निकम कुटुंबाची अवघ्या काही वर्षातच भरभराट झाली. याचं सगळं श्रेय ते आपल्या कमला गायीला देतात.

स्वतःच्या मुलांप्रमाणेच निकम दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.  निकम दाम्पत्यासही दोन मुली आहेत. गौरी गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असं सांगत आढेगावच्या निकम दाम्पत्याने मायेपोटी चक्क गौरी गायीचे डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गावजेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.

गायीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. निकम दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.