Cyclone Burevi : तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर

निवार हे चक्रीवादळ शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे.

Cyclone Burevi : तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 9:40 AM

चेन्नई : निवार हे चक्रीवादळ (Nivar Cyclone) शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी (Cyclone Burevi) असं नाव देण्यात आलं असून आज (शुक्रवारी) ते केरळ आणि तमिळनाडूच्या (Tamil Nadu) किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी गुरुवारपासून मुसळधार पावसाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. (Cyclone Burevi : 5 districts of Kerala and 6 districts of Tamil Nadu declared holiday)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतून हे वादळ पंबन येथे धडकणार असून तेथून ते कन्याकुमारीच्या तटवर्ती क्षेत्राकडे सरकणार आहे. चक्रीवादळामुळे कोडावसल, नागपट्टिणम, वदारनयाम, कराईकल, मुदुकुलाटून या कावेरी त्रिभुज परिसरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी 10 ते 20 सेमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या किनारी भागातील जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बुरेवी चक्रीवादळ आज दुपारपर्यंत तिरुवनंतपुरमच्या किणाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार चक्रीवादळ बुरेवीवर (Cyclone Storm Burevi) लक्ष ठेवून आहेत. तसेच या काळात केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी (K. Palaniswami) आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्याशी फोनवर बातचित केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांना शाह यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याची बातचित करुन त्यांना आश्वस्त केले होते.

दरम्यान, श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतात बुधवारी रात्री धडकलेल्या बुरेवी चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले नसले तरी पुढील 24 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेतील त्रिंकोमाली जिल्ह्यातील थिरियाया आणि कुचचावेली गावांदरम्यान बुधवारी रात्री हे चक्रीवादळ धडकले, असे तिथल्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 200 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

किनारी भागात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत, काही ठिकाणी घरांवरील छतांचे नुकसान झाले आहे. त्रिंकोमाली जिल्ह्यातील 12 घरे पाण्याखाली बुडाली आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 650 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने किनाऱ्यांपासून दूरवर मदत छावण्या उभारल्या असून तेथे किनारी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

इतर बातम्या 

‘निवार’ची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, राज्यात शेतकरी संघटनांचं उग्र आंदोलन, तर प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा एल्गार

Cyclone Burevi : ‘निवार’नंतर केरळ-तामिळनाडूला बुरेवी चक्रीवादळाचा धोका, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

(Cyclone Burevi : 5 districts of Kerala and 6 districts of Tamil Nadu declared holiday)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.