बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत…

गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी जेलमध्ये असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (DSK vehicles auction) अर्थात डीएसकेंच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे.

बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो, डीएसकेंच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव, किंमत...
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 11:08 AM

पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी जेलमध्ये असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (DSK vehicles auction) अर्थात डीएसकेंच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे. डीएसकेंच्या 20 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 13 अलिशान गाड्यांचा लिलाव (DSK vehicles auction) करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या 13 वाहनांची किंमत 2 कोटी 86 लाख 96 हजार इतकी आहे. येत्या 15 फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे.

मावळचे प्रांत अधिकारी संदेश सिर्के यांनी या गाड्यांच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. या 13 गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्षे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यता कोर्टाने या गाड्यांच्या लिलावाला परवानगी दिली होती.  बीएमडब्ल्यू गाडीची किंमत 85 लाख रुपये आहे, तर  पोर्शे या गाडीची किंमत 75 लाख रुपये इतकी आहे.   एमव्ही ऑगस्टाची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे, तर टोयाटो कॅमेराची किंमत 8 लाख रुपये इतकी आहे.

डी एस कुलकर्णींनी गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके सध्या कारागृहात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार आपले पैसे मिळतील या अपेक्षेत आहेत.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा आणि काही नातेवाईकत सध्या तुरुंगात आहेत.

घराला घर पण देणारी माणसे, अशी जाहिरातबाजी करत गुंतवणूकदरांची साधारण दोन हजार कोटींची फसवणूक केली. या घोटाळ्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमांगी, मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि इतर सहकारी तुरुंगात आहेत. तर डीएसकेंचा भाऊ मकरंद हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पण ऑगस्ट 2019 मध्ये दुबईला पळून जाताना त्याला पोलिसांनी पकडलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.