दाऊदचे गुन्हे सर्वांनाच माहित, पण डॉनची संपत्ती किती?

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 63 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. दाऊदची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांनाच परिचीत आहे. मात्र त्याची संपत्ती किती याचा अंदाज आजपर्यंत मोजक्याच मंडळींनी लावला. फोर्ब्स मॅग्झिनच्या मते, दाऊदकडे जवळपास 670 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 43 […]

दाऊदचे गुन्हे सर्वांनाच माहित, पण डॉनची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 63 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. दाऊदची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांनाच परिचीत आहे. मात्र त्याची संपत्ती किती याचा अंदाज आजपर्यंत मोजक्याच मंडळींनी लावला. फोर्ब्स मॅग्झिनच्या मते, दाऊदकडे जवळपास 670 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 43 हजार 550 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दाऊद जगातील टॉप 3 श्रीमंत डॉनच्या यादीत आहे.

दाऊदची संपत्ती

सर्वात श्रीमंत गुंडांच्या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा तिसरा नंबर लागतो.दाऊदकडे जवळपास 44 हजार कोटी रुपये संपत्ती आहे. दाऊदने तस्करी, हत्या, लूटमारी, गुन्हेगारीतून हा पैसा कमावल्याचं सर्वांना माहित आहे. दाऊद सध्या पाकिस्तानात असल्याचं म्हटलं जातं.

पोबलो एस्कोबार

एंटरटेन्मेंट साईट  द रिचेस्टच्या यादीत जगातील आतापर्यंतचा सर्वात श्रीमंत डॉन कोलंबियाच्या पोबलो एस्कोबारचा नंबर पहिला लागतो. त्याची संपत्ती जवळपास 3 हजार कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 1.95 लाख कोटी रुपये होती. कोकेन आणि अंमली पदार्थांच्या दुनियेचा बादशाह म्हणून पोबलो एस्कोबार ओळखला जातो. 90 च्या दशकात पोबलो एकटा 80 टक्के कोकेन पुरवठादार होता. 1993 मध्ये त्याला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

एमियो करिलो

जगातील श्रीमंत डॉनच्या यादीत मेक्सिकोच्या एमियो कॅरिलोचा दुसरा नंबर लागतो. त्याच्याकडे जवळपास 2500 कोटी डॉलर म्हणजेच 1.62 कोटी रुपये इतकी संपत्ती होती. कॅरिलोसुद्धा ड्रग्ज तस्करी करत होता. कोलंबियातील तस्करांना तो मदत करत होता. आपल्या बॉसची हत्या झाल्यानंतर तो टोळीचा प्रमुख बनला होता. त्याचा उंचे शौक होते. प्लास्टिक सर्जरी करताना त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

कॅरिलोनंतर दाऊद इब्राहिमचा नंबर श्रीमंत गुंडांच्या यादीत तिसरा आहे.

तर त्यानंतर कोलंबियाच्या ओशोआ ब्रदर्सचं नाव या यादीत चौथ्या नंबरवर आहे. ही तीन भावांची जोडी आहे. त्यांची संपत्ती सुमारे 600 कोटी (39 हजार कोटी) इतकी आहे.

म्यानमारच्या खून साचं नावही या यादीत पाचव्या नंबरवर आहे. त्याच्याकडे 500 कोटी डॉलर म्हणजेच 32 हजार कोटीची संपत्ती आहे. हा अफू आणि हत्यारं तस्करी करत होता. त्याने स्वत: 2 हजार लोकांची फौज तयार केली होती.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.