प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, हिजबूलचे दोन दहशतवादी ताब्यात

नवी दिल्ली : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच्या जॉईंट ऑपरेशन दरम्यान हिजबूल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक किफायतुल्ला बुखारी आणि दुसरा अल्पवयीन आहे. यांच्याजवळून एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले आहेत. हे दोन्ही दहशतवादी एरीया कमांडर नावेदच्या संपर्कात […]

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, हिजबूलचे दोन दहशतवादी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच्या जॉईंट ऑपरेशन दरम्यान हिजबूल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक किफायतुल्ला बुखारी आणि दुसरा अल्पवयीन आहे. यांच्याजवळून एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आले आहेत.

हे दोन्ही दहशतवादी एरीया कमांडर नावेदच्या संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नावेद हा काश्मीरी पोलिसात कार्यरत होता, 2017 साली तो दहशतवादी बनला. या दोन्ही दहशतवाद्यांपैकी एकाला एनसीआरमध्ये पाहण्यात आलं होतं. हे दहशतवादी एनसीआरमधून शस्त्र खरेदी करुन काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणायचे. हे संघटन दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी घटना घडवून आणण्याची योजना आखत होते.

दिल्ली स्पेशल सेलच्या या कारवाईत शोपिया पोलिसांनीही मदत केली. सध्या शोपिया पोलीस यांची चौकशी करत आहे. हे दहशतवादी एनसीआरमध्ये कुणाकडून शस्त्र खरेदी करायचे याचा तपास स्पेशल सेल करत आहे.

याआधी 6 सप्टेंबर 2018 ला आयएसआय आणि जम्मू-काश्मीरचे दोन दहशतवादी परवेश राशिद आणि जमसीद यांना लाल किल्ला परीसरातून अटक करण्यात आली होती. तर 24 नोव्हेंबर 2018 ला ताहीर, हरीस आणि आसिफ या तिघांना स्पेशल सेलच्या माहितीवरुन जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेडसोबत अटक करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.