कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार-फ्लॅट देणाऱ्या ‘कुबेर’ व्यापाऱ्याची झोळी फाटली

| Updated on: Sep 25, 2019 | 12:47 PM

2008 पेक्षाही भीषण मंदी आल्याचं सांगत सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार, फ्लॅट देण्यास असमर्थता दर्शवली.

कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार-फ्लॅट देणाऱ्या कुबेर व्यापाऱ्याची झोळी फाटली
Follow us on

सुरत : दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार किंवा फ्लॅट देणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया (Diamond businessman Savji Dholakia) यांना यावर्षी हात आखडता घ्यावा लागणार आहे. हिरे व्यापार मंदीच्या गर्तेत आल्यामुळे यंदा बोनस देणं शक्य नसल्याची हतबलता सावजींनी व्यक्त केली.

हिऱ्यांचे शहर असलेल्या गुजरातमधील सुरतमध्ये प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया (Diamond businessman Savji Dholakia) यांची ‘श्री हरी कृष्ण एक्स्पोर्ट’ ही कंपनी आहे. ढोलकिया दरवर्षी दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांवर भेटवस्तूंची खैरात करतात. मात्र वर्षानुवर्ष भरघोस बोनस घेण्याची सवय लागेलल्या कर्मचाऱ्यांची येत्या दिवाळीत निराशा होणार आहे.

हिरे उद्योग डबघाईस आल्यामुळे ढोलकिया यांचा नाइलाज झाला आहे. 2008 पेक्षाही भीषण मंदी आल्याचं सांगत ढोलकियांनी बोनस देण्यास असमर्थता दर्शवली. मंदीचा फटका बऱ्याच उद्योगांना बसलेला असताना भेटवस्तू देण्याचा खर्च मलाही परवडणार नाही, असं ढोलकिया म्हणाले.

‘येवले अमृततुल्य चहा’वर एफडीएची कारवाई, खट्टू ‘चहा’त्यांना संचालक सांगतात…

गेल्या सात महिन्यात हिरे उद्योग विश्वात 40 हजार जणांच्या नोकरीवर गदा आली आहे. तर सध्याच्या कर्मचाऱ्यांचा पगारही 40 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती आहे.

ढोलकिया 2015 पासून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून महागड्या वस्तू देतात. त्यावर्षी 491 कामगारांना कार भेट मिळाली होती, तर 207 कामगारांना दोन बेडरुमचा फ्लॅट दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आला होता. 503 कर्मचाऱ्यांना दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे ढोलकिया चर्चेत आले होते.

ढोलकिया यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर गेल्या वर्षी 6 हजार कोटी रुपयांच्या घरात होता. तेव्हा साडेपाच हजार कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत होते. त्यांचा व्यवसाय 71 देशांमध्ये विस्तारलेला आहे. प्रत्येक वर्षी काही कर्मचाऱ्यांना बोनसच्या रुपात कार, फ्लॅट, दागिने दिले जातात.