'येवले अमृततुल्य चहा'वर एफडीएची कारवाई, खट्टू 'चहा'त्यांना संचालक सांगतात...

'येवले अमृततुल्य चहा'च्या विक्रीसाठी पुण्यात पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

'येवले अमृततुल्य चहा'वर एफडीएची कारवाई, खट्टू 'चहा'त्यांना संचालक सांगतात...

पुणे : अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला (Yewale Amruttulya Tea) अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. पुण्यातील नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्यामुळे ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. त्यामुळे चहाप्रेमी काहीसे खट्टू झाले आहेत, परंतु सर्व अटींची पूर्तता करण्याची हमी कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.

‘येवले चहा’ची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा साठा पुण्यातून जप्त करण्यात आला आहे. विक्रीसाठी पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभरातील येवले चहाच्या शाखा (Yewale Amruttulya Tea) बंद ठेवण्यास सांगूनही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाखा सकाळच्या वेळेत सुरु असल्याचं आढळलं.

येवले अमृततुल्यमध्ये मेलानाईट हा आरोग्याला घातक असणारा घटक आढळून आलेला नाही. या पाहणीमध्ये पॅकिंगमध्ये काही त्रुटी आढळून आल्या असून त्याची आम्ही पूर्तता करत आहोत. सर्व फ्रान्चाईजी सुरु राहतील. ग्राहकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार आम्हला नाही. कारखान्यात काही चुका आढळून आल्या असून त्याची पूर्तता आम्ही केली आहे, असं येवले अमृततुल्य चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी सांगितलं.

पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. कोणत्याही वेळी चहाची तल्लफ भागवणारे ‘अमृतपेय’ पिण्यासाठी ‘चहा’त्यांची गर्दी उसळते.

All Is Not Well : हिंजवडीचा रस्ता दररोज तीन तास जाम, नोकरदारांचं मोदींसाठी ट्वीट

‘येवले चहा’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. कोंढवा भागातील कंपनीवर एफडीएने छापे टाकले असता चहाचं उत्पादन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या. आरोग्यास अपायकारक ‘मेलानाईट’ पदार्थ वापरल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली होती.

दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ‘येवले चहा’ला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असून चहामुळे पित्त होत असल्याची जाहिरात केली जाते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचा इशारा एफडीए सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिला आहे.

कोणकोणत्या त्रुटी आढळल्या?

-विक्री पॅकेटवर नियमानुसार आवश्यक माहितीचं लेबल नव्हतं.
-पॅकेटमधील अन्नपदार्थ आणि घटकपदार्थांच्या प्रमाणाचीही माहिती नाही.
-अन्नपदार्थाची प्रयोगशाळेकडून तपासणी केली जात नाही.
-उत्पादन नियंत्रणासाठी तज्ञ व्यक्तीची नेमणूकही केलेली नाही.
-उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नाही

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *