Nishikant Kamat | ‘लय भारी’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमध्ये उपचार

| Updated on: Aug 11, 2020 | 10:24 PM

'डोंबिवली फास्ट', 'लय भारी' यासारख्या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक आहे (Director Nishikant Kamat In Critical Condition).

Nishikant Kamat | लय भारी, दृश्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमध्ये उपचार
Follow us on

मुंबई : ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक आहे. लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामतची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर हैदराबादमधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Director Nishikant Kamat In Critical Condition)

निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ यासारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनय केला आहे.

अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्याने दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं (Director Nishikant Kamat In Critical Condition).

निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर त्याने मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

हेही वाचा :

नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी सापडला