365 गुन्ह्यांची उकल, पोलीस दलातील श्वानाचे निधन, ‘रॉकी’ला अलविदा करताना गृहमंत्रीही हळहळले

बीड पोलीस दलातील श्वानाचे काल (15 ऑगस्ट) दीर्घ आजाराने दु:ख निधन झाले (Dog death in Beed Police department).

365 गुन्ह्यांची उकल, पोलीस दलातील श्वानाचे निधन, रॉकीला अलविदा करताना गृहमंत्रीही हळहळले
| Edited By: | Updated on: Aug 16, 2020 | 3:41 PM

मुंबई : बीड पोलीस दलातील श्वानाचे काल (15 ऑगस्ट) दीर्घ आजाराने दु:ख निधन झाले (Dog death in Beed Police department). रॉकी असं निधन झालेल्या श्वानाचे नाव आहे. रॉकीच्या जाण्याने बीड पोलिसांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याबाबत ट्वीट करत रॉकीला श्रद्धांजली वाहिली (Dog death in Beed Police department).

दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते.

महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत.

“रॉकीने आजपर्यंत 365 गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील”, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

PHOTO : आवडत्या श्वानांसह राज ठाकरे शिवाजी पार्कवर, लहानग्यांसोबतही वेळ घालवला

Independence Day : रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांचं दिमाखदार संचलन, पोलिसांच्या श्वानाकडूनही मानवंदना