भाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या

किरकोळ वादातून झालेल्या दोन गटाच्या हाणामारीत शिवाजी खंडागळे या निष्पाप तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे

भाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या
| Updated on: Sep 19, 2020 | 4:43 PM

डोंबिवली : डोंबिवलीत भाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी एका तरुणाला महागात पडली आहे (Dombivali Youth Murder). किरकोळ वादातून झालेल्या दोन गटाच्या हाणामारीत शिवाजी खंडागळे या निष्पाप तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे (Dombivali Youth Murder).

डोंबिवली दत्तनगर परिसरात राहणारे संतोष लष्कर यांच्या मुलीचा वाढदिवस होता. या निमित्त त्यांनी एक छोटीशी पार्टी ठेवली होती. या ओली पार्टीत त्यांचा मेहूणा राजू धोत्रे आपल्या मित्र शिवाजी खंडागळेसोबत पार्टीला गेला. त्याठिकाणी ओली पार्टी झाली. पार्टीनंतर संतोषने राजूला सांगितलं की, महेश गुंजाळने पाच महिन्यापूर्वी तुला शिवीगाळ केली होती. यानंतर राजू यांनी महेशला फोन केला. हे तिघे आणि महेशचे काही साथीदार हे सर्व प्रगती कॉलेजच्या परिसरात जमा झाले.

दोघांच्या हाणामारीत निष्पाप शिवाजी खंडागळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी या प्रकरणी महेश गुंजाळ, निखिल माने, जयेश जुवळे, आशिष वाल्मिकी आणि श्रीनिवास सुगा या पाच आरोपींना अटक केली आहे.

Dombivali Youth Murder

संबंधित बातम्या :

पारनेरच्या तहसीलदारांचा विनयभंग केल्याचा आरोप, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

रात्री पतीसोबत भांडण, पत्नीची 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी

उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी बेपत्ता, तब्बल नऊ महिन्यानंतर खुनाचा उलगडा, नातेवाईकांना अटक