रात्री पतीसोबत भांडण, पत्नीची 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी

एका 25 वर्षीय महिलेने 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. (Gondia Lady Suicide with her child after Argument with husband)

रात्री पतीसोबत भांडण, पत्नीची 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी

गोंदिया : एका 25 वर्षीय महिलेने 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गोंदियातील रावणवाडी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिरामंटोला गावात ही घटना घडली आहे. (Gondia Lady Suicide with her child after Argument with husband)

गोंदिया तालुक्याच्या चिरमंटोला गावात राहणाऱ्या पदमा उईके या महिलेचं काल रात्री पंकज उईकेसोबत भांडण झालं होतं. पदमाची वडिलांनी तिच्या घरी येऊन तिची समजूत घातली होती. सकाळी घरातील सर्व सदस्य उठल्यावर त्यांनी पदमा आणि मुलगी मुस्कानचा शोध घेतला. मात्र ती घरात तसेच घराबाहेर दिसली नाही.

त्यानंतर घरासमोरील विहिरीजवळ पदमा आणि मुस्कानचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्याकरिता पाठवले. पदमाने नेमकी आत्महत्या का आणि कोणत्या कारणावरुन केली याचा शोध पोलीस घेत आहे. (Gondia Lady Suicide with her child after Argument with husband)

संबंधित बातम्या : 

सोन साखळीसाठी 20 वर्षीय तरुणाचा खून, मृतदेह खाडीत फेकला, तिघांना अटक

घरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *