राज ठाकरेंची सूचना, सरकारकडून अंमलबजावणी, देशांतर्गत विमान उड्डाणं बंद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Domestic Airline) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशांतर्गत विमान उड्डाणं बंद करण्याची सूचना दिली होती.

राज ठाकरेंची सूचना, सरकारकडून अंमलबजावणी, देशांतर्गत विमान उड्डाणं बंद

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Domestic Airline) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशांतर्गत विमान उड्डाणं बंद करण्याची सूचना दिली होती. त्यांच्या या सूचनेनंतर लगेच केंद्र सरकारने देशांतर्गत विमान उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे (Raj Thackeray on Domestic Airline). त्यामुळे आज मध्यरात्रीपासूनची देशांतर्गत सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सरकार महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेत आहे. याआधी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयानेदेखील माहिती दिली आहे. भारतात बुधवारपासून कोणतीही प्रवासी व्यावसायिक विमानांची उड्डाणे होणार नाहीत. सर्व विमान कंपन्यांना त्यांची सर्व प्रवासी विमाने मंगळवारी रात्री 11 वाजेपर्यंत गंतव्यस्थानावर उतरवावी लागणार आहेत. मात्र, देशातील मालवाहू उड्डाणांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील, असं नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूंच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली. “उद्धव ठाकरे यांच्याकडे डोमेस्टिक एरलाईन बंद करण्याची मागणी केली. त्यांनी करणार असल्याची माहिती दिली”, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर थोड्या वेळातच सर्व देशांतर्गत सर्व विमान उड्डाण रद्द केल्याची घोषणा सरकारने केली.

देशातील सर्व एक्सप्रेस बंद

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशातील प्रवासी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. देशातील सर्व मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी फक्त लोकल ट्रेन सेवा सुरु आहे. त्याचबरोबर राज्यातील एसटी महामंडळाच्याही गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

घराबाहेर पडण्यावर बंदी, राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात (CM Uddhav Thackeray On Corona Virus) येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Published On - 5:15 pm, Mon, 23 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI