…म्हणून ट्रम्प दारु आणि सिगारेटला स्पर्शही करत नाहीत!

| Updated on: Feb 24, 2020 | 3:38 PM

जगातील सर्वात बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष असतानाही ट्रम्प दारु किंवा सिगारेटला स्पर्शही करत (Donald Trump not drink liquor) नाही

...म्हणून ट्रम्प दारु आणि सिगारेटला स्पर्शही करत नाहीत!
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारतीय दौऱ्यावर (Donald Trump not drink liquor) आहेत. जगातील सर्वात बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष असतानाही ट्रम्प दारु किंवा सिगारेटला स्पर्शही करत नाही. फार कमी लोकांना हे माहिती आहे. राष्ट्राध्यक्ष असूनही ट्रम्प एक सर्वसामान्य कुटुंबातील माणसाप्रमाणे वावरतात.

ट्रम्पचे आपल्या कुटुंबासोबत अत्यंत भावनिक आहे. याच कारणामुळे त्यांनी स्वत:ला दारुपासून दूर ठेवले आहे. याशिवाय दारुपासून स्वत:ला दूर ठेण्याचे आणखी एक दुख:द कारणही त्यामागे आहे. ट्रम्प यांच्या मोठ्या भावाच्या मित्राला दारुचे व्यसन लागले होते. यामुळे वयाच्या 43 व्या वर्षी त्याच्या मोठ्या भावाच्या मित्राचा मृत्यू झाला.

ट्रम्प यांच्या मोठा भाऊ त्या मित्राचा फार जवळ होता. जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्या दिवसापासून ट्रम्प यांनी सिगारेट आणि दारुला स्पर्श न करण्याची शपथ घेतली.

“शेवटी दारु हीच अशी गोष्ट आहे की जिने त्याला (मित्राला) संपवले. त्यामुळे मला आनंद आहे की मी दारु पित नाही,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यक्रमात सांगितले (Donald Trump not drink liquor) होते.

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump message on visitor’s book at Sabarmati Ashram) आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प हे सकाळी 11.40 ला अहमदाबादच्या सरदार वल्लभ भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केले. त्यानंतर भव्य रोड शो नंतर 12.31 च्या सुमारास ट्रम्प साबरमती आश्रमात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरखा (Donald Trump not drink liquor) चालवला.