Amway India कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त, नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप

कंपनीच्या मालमत्तेमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात एमवेची जमीन आणि उत्पादन सुविधा केंद्र आहे. याबरोबरच मशिनरी, ऑटो, वित्तीय संस्था खाती आणि ठेवी यांचीही चौकशी केली जाणार आहे.

Amway India कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त, नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप
Amay कंपनीवर ईडीची कारवाईImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:09 PM

मुंबईः अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) आता प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. राजकीय नेत्यांवर धाडी सत्र चालूच असताना आज एमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (Amway India Enterprises Pvt Ltd.) कंपनीवर मल्टी लेव्हल मार्केटिंगचा घोटाळ्याचा ठपका ठेवत 757.77 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई तात्पुरती स्वरुपाच्या असून मालमत्ता जप्त (Property confiscated) केली असल्याचे सांगण्यात आले आहे. ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले की, एमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडच्या 757.77 कोटी रुपयांच्या मालमत्तेची तात्पुरती चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

या तपासानंतर असे सांगण्यात आले आहे की, कंपनीच्या मालमत्तेमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात एमवेची जमीन आणि उत्पादन सुविधा केंद्र आहे. याबरोबरच मशिनरी, ऑटो, वित्तीय संस्था खाती आणि ठेवी यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Amway ही कपंनीचे बहुस्तरावर काम

अंमलबजावणी संचालनालयाकडून Amway कंपनीच्या वेगवगेळ्या 36 खात्यांमधून 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि 345.94 कोटी रुपयांची वित्तीय संस्थेचा कारभार असल्याचा ठपका ठेऊन चौकशी लावली गेली आहे. Amway ही कपंनी बहुस्तरावर काम करत असून मनी लाँडरिंगचेही प्रकरण दिसून आले आहे. वेगवेगळ्या उत्पादनांचा प्रचार करत असल्याचे दाखवून या कंपनीकडून फसवणूक केली आहे असा आरोपही केला गेला आहे. या कंपनीकडून ज्या प्रकारे उत्पादनांची ऑफर दिले जाते, त्या उत्पादनांची खुल्या बाजारात मिळत असलेल्या मालापेक्षा या कंपनीच्या किंमती जादा असल्याचे ईडीकडून म्हटले आहे.

परदेशातही कंपनीची मोठी गुंतवणूक

या कंपनीकडून 2002-03 ते 2021-22 या कालावधीत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 27,562 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तर या कॉर्पोरेट कंपनीकडून भारतातील वितरक आणि सदस्यांना 7,588 कोटी रुपये देण्यात आले असून परदेशातही कंपनीची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली असल्याचा आरोप केला गेला आहे.

कंपनीने कष्टाचे पैसे उखळले

या कंपनीबाबत ईडीकडून गंभीर आरोप करण्यात असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, कंपनीची वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय सामान्य नागरिकांना कंपनीचे सदस्य म्हणून सामील होण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यानंतर भरमसाठ किंमतीने ती उत्पादने खरेदी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते, त्यामुळे त्यांच्या कष्टाचे पैसे कंपनीकडून उखळले जातात असे म्हटले आहे. कंपनीचे सदस्य बनवून त्यांनाही खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते, त्यामुळे कंपनीचे उत्पादन किती तरी पटीने वाढत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. कंपनीचा वापर फक्त प्रचार करण्यासाठी केला जात असून कंपनीचे सदस्यांना अधिकाधिक पैसा कसा मिळेल याकडे फक्त लक्ष दिले जात असले तरी उत्पादनांच्या दर्जावर भर दिला जात नाही. त्यामुळे ही कंपनी फक्त प्रचारी करणारी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Shivsena : हिंदू मतं गमावण्याची भीती? सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, राऊतांनी कारण सांगितलं

Pune accident : दुचाकीच्या धडकेनं रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून गेलं पीएमपीचं चाक!

Infosys: ‘इन्फोसिस’च्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण; गुंतवणूकदारांचे 48,000 कोटींचे नुकसान

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.