AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanath Shinde : एकनाथ शिंदेंकडे 34 आमदार कन्फर्म, आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं झिरवळांना पत्र, ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला!

आमदार एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांच्या (MLA) स्वाक्षऱ्यांचं पत्र पाठवलं आहे.

Ekanath Shinde : एकनाथ शिंदेंकडे 34 आमदार कन्फर्म, आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं झिरवळांना पत्र, ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला!
एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 22, 2022 | 4:57 PM
Share

 मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Ekanath Shinde) बंडाळीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी आधीच वाढली आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदे गटाने आणखी एक धक्का दिलाय. आमदार एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांच्या (MLA) स्वाक्षऱ्यांचं पत्र पाठवलं आहे. यावरुन शिंदेंसोबत तेवढे आमदार कन्फर्म असल्याचा अर्थ काढला जातोय. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर पुन्हा मेठा पेच निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.  दरम्यान, काल शिवसेनेनं सतरा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र  विधानसभा उपाध्यक्षांसमोर देऊन अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता.

आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं झिरवळांना पत्र

आकडा कसा कळला?

आपल्यासोबत किती आमदार आहेत. हे शिंदे यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी कोणताही दावा केला नव्हता. मात्र, शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचा मीडियाचा अंदाज होता. त्यानंतर काल रात्री उशिरा शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं. सुरत येथील ला मेरेडियन हॉटेलमधून या आमदारांना विमानतळावर नेण्यात आलं. त्यासाठी बस आणली होती. त्यावेळी आमदार रांगेत उभे राहून बसमध्ये चढले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिंदे यांच्यासोबत 45 आमदार असल्याचं कन्फर्म झालं. शिंदे यांनीही नंतर मीडियाशी संवाद साधातना आपल्याकडे 40 आमदार असल्याचं सांगितंल होतं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही फूट रोखण्याचं शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार