गोविंदाला कादर खान यांच्या मुलाचे कडवे सवाल

टोरंटो : दमदार संवाद लेखण आणि अभिनयामुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर छाप सोडलेले अभिनेते कादर खान अनंतात विलिन झाले. कॅनडातील टोरंटोमध्ये भारतीय वेळेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कादर खान यांचे भारतातील नातेवाईक कॅनडात उपस्थित होते. कादर खान आपल्यात राहिले नसले तरी त्यांनी लिहिलेले संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. कादर खान यांच्यावर चाहत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम […]

गोविंदाला कादर खान यांच्या मुलाचे कडवे सवाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

टोरंटो : दमदार संवाद लेखण आणि अभिनयामुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर छाप सोडलेले अभिनेते कादर खान अनंतात विलिन झाले. कॅनडातील टोरंटोमध्ये भारतीय वेळेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कादर खान यांचे भारतातील नातेवाईक कॅनडात उपस्थित होते. कादर खान आपल्यात राहिले नसले तरी त्यांनी लिहिलेले संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.

कादर खान यांच्यावर चाहत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम केलं असलं तरीही बॉलिवूडने मात्र शेवटच्या काळात या दिग्गजाकडे दुर्लक्ष केलं. याची जाणीव त्यांचा मुलगा सरफराजलाही आहे. कादर खान यांचं इंडस्ट्रीत सर्वात जास्त प्रेम बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर होतं आणि बिग बींचंही त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं, असं सरफराजने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

गोविंदाबाबतही सरफारजला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर मात्र सरफारजला राग आल्याचं पाहायला मिळालं. “जरा गोविंदाला विचारा की त्याने माझ्या वडिलांची विचारणा केली? वडिलांच्या निधनानंतर त्याने एखादा फोन तरी केला का? फिल्म इंडस्ट्रीत लोक बोलतात एक आणि करतात दुसरंच. आजचे टॉप अभिनेते आहेत ते जुन्या अभिनेत्यांसोबत फोटोत तर दिसतात, पण प्रेम फक्त फोटोंपुरतंच असतं. माझे वडील नशिबवान होते, की तीनही मुलांनी त्यांची चांगली काळजी घेतली. पण त्यांचं काय, ज्यांना अखेरच्या क्षणालाही चांगले दिवस नशिबात नसतात? असा सवाल सरफराजने केला.

कादर खान आणि गोविंदा यांचं एक वेगळंच नातं होतं. दोघांच्या जोडीने 41 सिनेमांमध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. कादर खान कधी गोविंदाच्या वडिलाच्या भूमिकेत असायचे, तर कधी सासऱ्याच्या. पण ही जोडी नेहमीच नंबर वन होती.

कादर खान यांचं निधन झाल्यानंतर गोविंदाने ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली होती. कादर खान माझे उस्ताद नव्हते, तर वडिलांसारखेच होते. त्यांच्या जाण्याने मी प्रचंड दुःखी आहे आणि सिनेजगतातील प्रत्येकाला दुःख झालंय, असं ट्वीट गोविंदाने केलं होतं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.