विजेच्या खांबावर चढून हायटेन्शन वायर पकडली, मजुराची आत्महत्या

विजेच्या खांबावर चढून हायटेन्शन वायर पकडली, मजुराची आत्महत्या

वर्धा : शेतातील विद्युत खांबावर चढून एका मजुराने आत्महत्या केली. ही घटना सेलूकाटे जवळील केसलापूर शिवारात घडली आहे. राजू भगवान रामटेके (वय 35) असं आत्महत्या केलेल्या मजुराचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. वर्धा येथील सावंगी पोलीस स्टेशनअंतर्गत […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

वर्धा : शेतातील विद्युत खांबावर चढून एका मजुराने आत्महत्या केली. ही घटना सेलूकाटे जवळील केसलापूर शिवारात घडली आहे. राजू भगवान रामटेके (वय 35) असं आत्महत्या केलेल्या मजुराचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

वर्धा येथील सावंगी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या केसलापूर शिवारात ही आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या इसमाने परिसरातील एका शेताच्या बाजूला असलेल्या सिमेंट खांबावर चढत विद्युत तार पकडून आत्महत्या केली. सकाळी शेतकरी पद्माकर बाळसराफ हे शेतात गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांसह महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच विद्युत खांबावर लटकलेला मृतदेह खाली काढत, शवविच्छेदनासाठी नजिकच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. या घटनेत विद्युत तार पकडल्याने मजुराचा चेहरा सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सावंगी पोलीस याचा अधिक तपस करीत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें